घरक्रीडाकुस्तीपटूंचे आंदोलन तूर्तास स्थगित, 'या' तारखेपर्यंत दिली मुदत; अन्यथा...

कुस्तीपटूंचे आंदोलन तूर्तास स्थगित, ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदत; अन्यथा…

Subscribe

आज (ता. 07 जून) केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी आज आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. यानंतर या आंदोलकांनी 15 जूनपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,

भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर या प्रकरणी महिलांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर 23 एप्रिलला आंदोलन करण्यास सुरूवात केली. 40 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून देखील या प्रकरणी केंद्रातील कोणत्यात नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली. पण आज (ता. 07 जून) अखेरीस केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी आज आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. यानंतर या आंदोलकांनी 15 जूनपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्याकडून देण्यात आली आहे.

अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बजरंग पुनिया याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही या बैठकीत काही मुद्द्यावर चर्चा केली. पोलीसांची चौकशी ही 15 जूनपर्यंत पूर्ण होईल. क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला विनंती केली की तोपर्यंत तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा.’

- Advertisement -

‘क्रीडा मंत्र्यांनी महिला कुस्तीपटूंच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाईल असे सांगितले. आम्ही त्यांच्याकडे कुस्तीपटूंविरूद्ध दाखल केलेल्या सगळ्या एफआयआर मागे घेण्याची देखील मागणी केली आहे. त्यांनी हे मान्य केले आहे.’ असेही बजरंग पुनिया यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

बृजभूषण सिंहवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून या वर्षी जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पूनिया, रवी दहिया आदींच्या नेतृत्वात जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यास सुरूवात केली होती. ज्यानंतर या देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. ज्यानंतर केंद्रातील सरकारने या आंदोलक कुस्तीपटूंसोबत चर्चा करण्यास सुरूवात केली. पण आंदोलक कुस्तीपटू चर्चेच्या माध्यमातून पण ऐकायला तयार नसल्याने अखेरीस क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. बॉक्सर मेरी कोम यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. जी अद्यापही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या समितीतील सदस्य कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, की नाही याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

मेरी कोम अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून महिनाभरात अहवाल देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. ज्यानंतर या प्रकरणी सुरू असलेले जानेवारी महिन्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे विनेश फोगाट हिने ऑक्टोबर 2021मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ब्रृजमोहनच्या काळ्या कृत्यांबाबत तिने मोदींना माहिती दिली. पण दीड वर्ष उलटूनही मोदींनी या प्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही. तर या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी आक्रमक होत या आंदोलक कुस्तीपटूंनी आपले पदक गंगेकत विसर्जित करण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण या प्रकरणात शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केल्याने कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय मागे घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -