अहो आश्चर्यम! जपानमध्ये समुद्री ज्वालामुखी फुटून बाहेर आल्या दुसऱ्या महायुद्धातील २४ युद्धनौका

टोकियोपासून जवळपास १२०० किलोमीटर दक्षिण प्रशांत महासारागाच्या इयो जीमा या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धातील २४ युद्धनौका सापडल्या आहेत.

wwii ghost ships resurface in pacific ocean volcano eruption
अहो आश्चर्यम! जपानमध्ये समुद्री ज्वालामुखी फुटून बाहेर आल्या दुसऱ्या महायुद्धातील २४ युद्धनौका

जपानची राजधानी टोकियोमध्ये प्रशांत महासागरात एक ज्वालामुखी फुटला आणि मोठा भुकंप झाला. भुकंपानंतर एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्रातून दुसऱ्या महायुद्धातील तब्बल २४ युद्धनौका बाहेर आल्या आहेत. भुकंपानंतर त्या परिसराची हेलिकॉप्टरने पाहणी करण्यात आली यावेळी समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी या युद्धनौका तरंगताना दिसल्या. सध्या या युद्धनौकांचे फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. टोकियोपासून जवळपास १२०० किलोमीटर दक्षिण प्रशांत महासारागाच्या इयो जीमा या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धातील २४ युद्धनौका सापडल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धावेळी या युद्धनौका समुद्रात बुडाल्या आणि फुकुतौकू ओकानोबा हा ज्वालामुखी फुटल्याने या युद्धनौका बाहेर आल्या आहेत. या युद्ध नौका फार बिकट अवस्थेत असून फार भयावह दिसत आहेत. अनेक जण समुद्र किनाऱ्यांवर या युद्धनौका पाहण्यासाठी तसेच त्यांचे फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

समुद्रात ज्या ठिकाणी या युद्धनौका आढळल्या आहेत त्या ठिकाणी १९४५मध्ये दुसऱ्या महायुद्धात अमेरिकी सैन्याच्या अनेक नौका बुडाल्या होत्या. या ठिकाणाला बॅटल ऑफ इयो जीमा असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धात या ठिकाणी जवळपास ७० हजार अमेरिकी सैन्य मरिन्स जापानचे २० हजार सैनिक युद्ध करत होते. युद्धांती अमेरिकेचे २० हजार सैनिक जखमी झाले होते. तर सात हजारांहून अधिक मरिन्स सैनिक मारले गेले होते. युद्धाच्या शेवटी केवळ २१६ जापानी सैनिक वाचले होते.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जी जहाजे बाहेर आली त्यातील अनेक जहाजे ही वाहतूकीची जहाजे होती. ही जहाजे अमेरिकी सैन्यांनी जप्त केली आहेत. अमेरिकी नॅशनल आर्काइव्हने दिलेल्या माहितीनुसार, इयो जीमा म्हणजेच या समुद्रात कोणतेही बंदर नव्हते. युद्धानंतर अमेरिकी सैन्याने ही जहाजे बॉम्बच्या सहाय्याने उडवली होती. जहाजे समुद्रात बुडाल्यानंतर समुद्रात एक भित तयार झाली.

जापानी सरकारच्या सेंटर फॉर इंटीग्रेटेड वॉल्कोनो रिसर्चचे अधिकारी सेतसुया नाकाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकुतोकू ओकानोबा हा ज्वालामुखीची या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून समुद्रात विस्फोट होण्यास सुरुवात झाली होती. या विस्फोटामुळे सतत भुकंपाचे धक्के बसत होते. विस्फोटामुळे जमा होणारी राख आणि लावा दगडांमधून समुद्राच्या आत ढिगारे तयार करत होती. या ढिगाऱ्यांमुळे समुद्रात बुडालेली जहाजे वर आली.

इयो जीमा द्विप बोनिन आयलँडचाच एक भाग असून या ठिकाणी जवळपास ३० आयरलँड्स आहेत. हे द्विप प्रशांत महासागरच्या तळाशी असलेल्या पॅसिफीक टेक्टोनिक प्लेट आणि फिलिपीन्स सी प्लेटच्या आघाताने तयार झाले आहेत. मात्र हे द्विप सध्या ज्वालामुखीच्या निशाण्यावर असून या ठिकाणी वारंवार भूकंपाचे धक्के बसत असतात.

जापानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून इयो जीमा द्वीपजवळ ७ ऑक्टोबर रोजी ५.९ तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे टोकियो सहीत अनेक ठिकाणे हादरली होती.


हेही वाचा – Viral Video: Brock Lesnarला पाहून चाहती झाली वेडी; ब्रेस्टवर घेतला ब्रॉकचा ऑटोग्राफ