घरताज्या घडामोडीYogi Adityanath Oath Ceremony: आज योगी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ; पंतप्रधान...

Yogi Adityanath Oath Ceremony: आज योगी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ; पंतप्रधान मोदींसह 12 राज्यातील CM होणार साक्षीदार

Subscribe

सध्या चर्चेत असलेला चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री पल्लवी जोशीसह बरेच सेलिब्रिटी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

2017च्या 5 वर्षानंतर आज संध्याकाळी 4 वाजता लखनऊच्या इकाना स्टेडियमध्ये ‘मै योगी आदित्यनाथ..ईश्वर की शपथ लेता हूं की’ असा आवाज सर्वत्र येणार आहे. योगी 2.0 सरकारला आजपासून सुरुवात होणार आहे. या चर्चेत शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवाय भाजपचे सरकार असणाऱ्या १२ राज्याचे मुख्यमंत्री या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार बनणार आहेत. आज योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. माहितीनुसार, योगी आदित्यानाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास ४६ मंत्री शपथ घेऊ शकतात.

बॉलिवूड सेलिब्रिटी शपथविधी सोहळ्याला लावणार हजेरी

नवीन उत्तर प्रदेश बनवण्याच्या संकल्पनेसोबत योगी आदित्यनाथ आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यापूर्वी औपचारिकता पूर्ण केली आहे. योगींच्या या शपथविधी सोहळ्याला राजकारणातील नेतेमंडळीपासून उद्योगपती, बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थितीत राहणार आहेत. माहितीनुसार योग गुरू बाबा रामदेव, सध्या चर्चेत असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री पल्लवी जोशीसह बरेच सेलिब्रिटी उपस्थितीत राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्याला सुरक्षा व्यवस्था मजबूत तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण सोहळ्यादरम्यान इकाना स्टेडियम आणि लखनऊ प्रवेश येथे ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय स्टेडियम जवळ असलेल्या सर्व उंच इमारतीमधून सोहळ्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच सोहळ्याच्या वेळी एटीएस कमांडो तैनात असणार आहे. ५ कंपनी पीएसी आणि ३ हजार पोलीस कर्मचारी शपथविधी सोहळ्यात तैनात केले जाणार आहेत.

- Advertisement -

अशी केली व्यवस्था 

लखनऊमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमपर्यंतचा भाग आजच्या दिवसांसाठी वीआयपी असणार आहे. विमानतळापासून ते स्टेडियमपर्यंत चहूबाजूला साफ-सफाई आणि सजावट केली आहे. या शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या लोकांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तीन जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. इकाना स्टेडियमच्या समोर पलासियो मॉलच्या मैदानावर जवळपास ५ हजार गाडांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. मेदांता रुग्णालयाच्या येथे जवळपास १ हजार बसेस उभ्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे योगींच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्या वक्तव्यांसाठी कचऱ्याची टोपलीच योग्य –सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना सुनावले


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -