घरमहाराष्ट्रनाशिकटाटा समूहाच्या पहिल्या स्टार बाझारचे उद्घाटन

टाटा समूहाच्या पहिल्या स्टार बाझारचे उद्घाटन

Subscribe

किफायतशीर दरात खरेदीची संधी, ऑनलाईन ऑर्डरचीही सुविधा

नाशिक : ग्राहकांना किराणा, भाजीपाला, फळांसह मांसाहार अत्यंत किफायतशीर दरांमध्ये खरेदीची संधी नाशिककरांना उपलब्ध झालेली आहे. कॉलेजरोडवरील श्रध्दा मॉल येथे टाटा समूहाच्या स्टार बाझार या दालनाचे उद्घाटन झाले. हे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील पहिले दालन आहे. या दालनात भेट देत ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच, घरपोच सुविधेसाठी संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मागणी नोंदविता येणार आहे.स्टार बाझारच्या उद्घाटनाप्रसंगी श्रध्दा मॉलचे संचालक सुरेश पाटील, विद्या सुरेश पाटील, आर्किटेक्ट कृणाल पाटील, स्टार बाझारचे ऑपरेशन हेड एम. के. सुरेश, एरिया मॅनेजर मिलिंद टोकरे, बिझनेस डेव्हलपमेंट साईनाथ आंगादी, स्टोअर मॅनेजर भैरवनाथ गिलबिले व कर्मचारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ब्रँड म्हणून परीचित असलेले टाटा समूहाचे स्टार बाझार सध्या हैद्राबाद, बंगलोर या मोठ्या शहरासह राज्यातील मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे दालन ग्राहक सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे. उत्तर महाराष्ट्र व नाशिकमधील क्षमता ओळखून कंपनीतर्फे नाशिकच्या श्रध्दा मॉलमध्ये दाखल ग्राहकांसाठी खुले केले आहे. स्टार बाझारला भेट देत किफायतशीर दरांमध्ये किरणा वस्तू, गृहोपयोगी वस्तू, ताजा भाजीपाला, मांसाहार पदार्थांसह अन्य वस्तूंची खरेदी करता येणार आहे. ऑनलाईनदेखील ऑर्डर करता येईल.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी कटिबद्ध : सुरेश पाटील

नाशिकच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी श्रद्धा मॉलची उभारणी केली आहे. या मॉलच्या माध्यमातून वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रँड नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध आहे. टाटा समूहाचे स्टार बाझार ग्राहकांसाठी खुले झाले असून, या माध्यमातून नाशिकच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -