घरट्रेंडिंगViral Video: 'भय्या जल्दी नीचे उतार दो', पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा हास्यकल्लोळ

Viral Video: ‘भय्या जल्दी नीचे उतार दो’, पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा हास्यकल्लोळ

Subscribe

पॅराग्लायडिंग करताना तरुणीची उडाली घाबरगुंडी

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या व्हिडिओने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पॅराग्लायडिंग करतानाचा असून हिमाचल प्रदेशाचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीची अवस्था बघून हास्यकल्लोळ उठला आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील खाज्जिअरी येथील असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला ही तरुणी मोठ्या उत्साहात पॅराग्लायडिंग करण्यासाठी जाते आणि उंचावर पॅराग्लायडिंग गेल्यावर तिची अक्षरश: वाईट अवस्था होते. ते या व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच ही तरुणी ‘भय्या जल्दी नीचे उतार दो’, अशी एकच विनंती पॅराग्लायडिंग गाईडला करत असते. तर तो तिची हसतखेळत समजूत घालत असल्याचे देखील दिसून येत आहे.

- Advertisement -

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये या तरुणीची अक्षरश: घाबरगुंडी उडालेली पहायला मिळत आहे. ती सातत्याने गाईडला मला खाली उतरवा, अशी मागणी करत असते. तर गाईड देखील तिची हसत खेळत समजूत काढताना दिसत आहे. या तरुणीला मात्र पॅराग्लायडिंगची हौस चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे. सुरुवातीला या तरुणीने घाबरत का होईना पण, पॅराग्लायडिंग करण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र, पॅराग्लायडिंग जसे उंचावर जाते तशी तिला भिती वाटण्यास सुरुवात होते आणि ती आरडाओरड करु लागते. तरुणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून हजारोच्या संख्येने लाईक्सचा या व्हिडिओवर पाऊस पडला आहे.


हेही वाचा – २००० रुपयांची नोट होणार बंद? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -