घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाग्रामीण जीवनशैली साकारणारा 'बाप्पा'

ग्रामीण जीवनशैली साकारणारा ‘बाप्पा’

Subscribe

सध्याच्या पिढीला ग्रामीण जीवनशैली कशी असते हे कळावे याकरता कल्याण येथील गोरे या कुटुंबाने खेड्यातील जीवनशैलीचा देखावा तयार केला आहे - वोट करा

कल्याण येथील गायत्री गोरे या कुटुंबियांकडे गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून त्यांच्याकडे शाडूची मूर्ती बसवण्यात येते. त्याचबरोबर यंदा या कुटुंबियांनी इको फ्रेंडली देखावा तयार केला आहे. या देखाव्यात त्यांनी ग्रामीण भागातील घर, तेथील सण कसे साजरे केले जातात याचा चित्र या देखाव्यातून मांडले आहे. या देखाव्यातून त्यांनी ग्रामीण जीवनशैली दाखवली आहे.

या देखाव्यात त्यांनी शाडूमाती,भातुकलीची खेळणी,पुरणपोळी बनवणारी बाई, विहीर, विहीरीतील पाणी भरणारी बाई, गणपतीची पूजा करणारे भटजी, सूप, आईस्क्रिमच्या काडीपासून बैलजोडी असे सर्व ग्रामीण जीवनशैली तयार करण्यात आली आहे. या देखाव्यासाठी वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य हे विघटनशील आहे. त्यामुळे याचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे गोरे कुटुंब सांगतात.

- Advertisement -

 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisement -

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

6 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -