घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां ऐसियापरि बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥
अर्जुन म्हणतो, आता अशाप्रकारे जर आपण बोध करीत असला, तर मग आमचे चांगलेच करीत आहात! मग तेथे ज्ञानाची आशा कशाला पाहिजे?
तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणीक एक असे जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥
ज्ञान संपादन करण्याची हौस संपली, परंतु उलटे एक असे झाले की, माझ्या मनाची स्थिरता जाऊन ते जास्त घोटाळ्यात पडले आहे!
तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र काहीं नेणिजे जरी चित्त पाहसी माझें । येणें मिषें ॥
त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुमची लीला आम्ही काही जाणू शकत नाही. या उपदेशाच्या मिषाने जर आपण माझे मन पाहत असाल तर कोण जाणे!
ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्वचि कथिलें ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । जाणवेना ॥
किंवा मला फसवीत आहात, का गूढार्थाने ब्रह्मस्वरूप सांगत आहात, याचे अनुमान करता, खरे काहीच कळत नाही.
म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥
म्हणून, देवा ऐका. हा गूढार्थ न सांगता जो काही आपला विचार असेल तो अडाण्यालाही समजेल अशा प्रकारे स्पष्ट सांगा.
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥
श्रीकृष्णा, मी अतिशय मंदबुद्धि आहे, तेव्हा अशा मलाही चांगले समजेल, असे एक निश्चयात्मक बोलणे आपण बोला.
देखैं रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥
असे पहा, औषध देऊन रोग तर नाहीसा व्हावा, परंतु ते औषध मधुर व रुचकर असावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -