घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अखंड अगर्वता होऊनि असती । तयांचीं विनय हेचि संपत्ती । जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥
ते नेहमी गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते व ते जय जय मंत्राने आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात.
नमितां मानपमान गळाले । म्हणौनि अवचितां ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥
नम्र होता होता त्यांना मानापमानाचा विचार राहत नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात.
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥
अर्जुना, अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ती तुला सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ती करतात, ते कोणते भक्त ते ऐक.
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥
परंतु हे किरिटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच व त्याबद्दल आम्ही पूर्वी वर्णन केलेच आहे.
तंव आथि जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवें? ॥
तेव्हा अर्जुन म्हणाला,‘होय हा ईश्वरी प्रसादच आहे, तथापि अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवते का?’
या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयांतें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥
तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकून, त्याची श्रवणाची आतुरता पाहून भगवान सुखाने डोलू लागले.
म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥
आणि म्हणाले,‘पार्था, भले शाबास, बाकी सांगितलेली गोष्ट पुनः सांगणे हे या युद्धाच्या वेळी अनुचित आहे, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -