घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

 

 

- Advertisement -

 

ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥
हे पहा, ज्या मनुष्याचे ठिकाणी अशाप्रकारच्या ज्ञानाची आवड नाही, त्याचे जगणे काय म्हणावयाचे! त्यापेक्षा मरण चांगले!
शून्य जैसें कां गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥
एखादे ओसाड घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याचप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवन मोहयुक्त असते.
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥
खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही, परंतु ते प्राप्त होण्याची जो मनुष्य इच्छा बाळगतो, त्याला काही ज्ञानप्राप्तीचा संभव आहे.
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥
ज्ञान असण्याविषयीची गोष्ट राहिली, परंतु ते प्राप्त व्हावे, अशी ज्यास ओढ नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज.
जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं अरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असे फुडें । जाणों एकीं ॥
का की, अमृतही आवडत नाही, अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते, तेव्हा त्या मनुष्याचा मृत्यू ओढवला आहे, असे समजावे.
तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशयें अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥
त्याचप्रमाणे विषयसुखातच जो आनंद मानतो आणि ज्ञान प्राप्तीविषयी बेपर्वा असतो, त्याला संशयाने घेरले आहे यात संशय नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -