घरमनोरंजन'83' Movie: कपिल देव प्रमाणे दिसण्यासाठी रणवीरने केली प्रचंड मेहनत

’83’ Movie: कपिल देव प्रमाणे दिसण्यासाठी रणवीरने केली प्रचंड मेहनत

Subscribe

भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आहे . भारताने पहिल्यांदा  1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिवसागणीक क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये वाढ होत गेली आणि भारत हा क्रिकेटवेडा देश आहे असं ही अनेकजण बोलू लागले. भारताने माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या नेतृत्वाअंतर्गत 1983 च्या वर्ल्डकपवर बाजी मारली. या ऐतिहासिक दिवसावर आधारीत ’83’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली असून या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अनेक किस्से आणि स्टेडियमवरील घटनेचा उल्लेख क्रिकेटर्सने केला आहे. यासोबतच कपिल देव यांनी रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतूक देखील केलं आहे.

सिनेमामध्ये सर्वाधीक फोकस हा क्रिकेटचे स्टेडीयम गाजवणार आणि इतिहास रचणारा कपिल देव यांची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंहवर करण्यात आला आहे. मात्र रणवीरला कपिल देव प्रमाणे दिसण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.  कपिल देव यांची हेयरस्टाइल, त्यांच्या सारखे दात तसेच त्यांचा आवाज , इंग्रजी बोलतेवेळी त्यांना येणार अडथळा या सर्व बारीक गोष्टी आत्मसात करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

मुलाखती दरम्यान रणवीरने त्याच्या भूमिकेचा खुलासा केला आहे. रणवीर म्हणाला की त्याने त्याचा बहुमूल्य वेळ सिनेमासाठी दिला असून त्याने शारिरीकदृष्ट्या देखील खूप कष्ट घेतले आहेत.  6 महिन्यापर्यंत रणवीरने दिवसातील 4-4 तास क्रिकेटच्या मैदानावर प्रॅक्टीस केली असून अत्यंत बारीकीने त्याने कपिल देव यांची स्टाईल आत्मसात केली आहे. तसेच 83 साठी त्याला वजन देखील कमी करावे लागले होते. रोज 2 तास जीममध्ये वर्क आऊट केल्यानंतर तसेच 6 महिन्यांच्या कठीण परिश्रमानंतर रणवीर कॅमेरासमोर भूमिका साकारण्यासाठी तयार झाला .

- Advertisement -

83 हा सिनेमा 24 डिसेंबर रोजी सिनेमागृहात दाखल होणार असून सिनेमाच्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळतोय. तसेच सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक असल्याचे दिसतय


हे हि वाचा – ‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवरून आडनाव हटवले

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -