घरमनोरंजनधोंडी चम्प्या निघाले चित्रीकरणाला

धोंडी चम्प्या निघाले चित्रीकरणाला

Subscribe

मराठीत स्टॅण्डअप कॉमेडीला वेगळे रूप देण्यात ज्ञानेश भालेराव याचा मोठा वाटा आहे. कॉमेडी एक्स्प्रेस या रिअ‍ॅलिटी शोचे जवळजवळ सहाशे भागांचे दिग्दर्शन त्याने केले होते. मधल्या काळात दोन चित्रपटही केले. अर्थात यालासुद्धा काही महिने उलटलेत. आता उत्तम कथा हाती लागली आहे म्हटल्यानंतर सुनिल जैन, आदित्य जोशी, अरबिंद ठाकूर, आदित्य शास्त्री, वेनेसा रॉय या निर्मात्यांना घेऊन ‘धोंडी चम्प्या एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तो करतो आहे. ग्रामीण भागात आजही शुल्लक कारणांवरून भांडणं होतात, घराची विभागणी होते आणि वर्षानुवर्षे तोच मुद्दा घेऊन भांडण्याची वृत्ती काही थांबलेली नाही. अनेक पिढ्या गेल्यानंतरही अलीकडच्या पिढीला मात्र हे भांडण नकोसे वाटते. ते सुधारण्याचा प्रयत्न करतात, पण समस्या सुटण्याऐवजी गोंधळच आधिक होऊ लागतो.

निव्वळ करमणूक करण्याच्यादृष्टीने ज्ञानेशने या चित्रपटाची बांधणी केलेली आहे. नुकताच त्याचा मुहूर्त झाला आणि चित्रीकरणासाठी निघालेले आहेत. नाटक एके नाटक करणारे दोन अभिनेते मात्र कथा ऐकून प्रभावित झाले आणि काही झाले तरी नाटक सांभाळून हा चित्रपट करायचाच हा इरादा त्यांनी पक्का केला. भरत जाधव आणि वैभव मांगले हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत आणि नाटक सांभाळून चित्रपटाला वेळ देणार आहेत. निखिल चव्हाण, सायली पाटील ही जोडी या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मुहूर्ताच्यावेळी निर्मात्यांसह संगीतकार सौरभ-दुर्गेश उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -