घरमनोरंजनटीव्ही जगताला हादरा; 'कसोटी जिंदगी की' मालिकेतील कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

टीव्ही जगताला हादरा; ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

वैशाली ठक्कर, राजू श्रीवास्तव, दीपेश भान यांच्या निधनानंतर हिंदी टेलिव्हिजनमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता आणि मॉडेल सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धांतने हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्घांतला हृदयविकाराचा झटका आला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिद्धांतने आपलं नाव सिद्धांत आनंद सूर्यवंशी बदलून सिद्धांत वीर सूर्यवंशी केलं होतं.

अल्पवयातच घेतला जगाचा निरोप

- Advertisement -

सिद्धांत वीर सूर्यवंशी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम करत आहे. सिद्धांतच्या मृत्यूने हिंदी टेलिव्हिजनला हादरा बसला आहे. जवळपास 45 मिनिट डॉक्टरांनी सिद्धांतला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, त्यानंतर त्यांच्या हाती अपयश आलं.

या मालिकांमध्ये केलं होत काम
सिद्धांत सूर्यवंशीने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेव्यतिरिक्त त्याने ‘सुफियाना इश्क मेरा’, ‘जिद्दी दिल माने ना’, ‘वारिस’ आणि ‘सात फेरे: सलोनी का सफर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘क्यू रिश्तो मे कट्टी बट्टी’ या मालिकेत तो शेवटचा दिसला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

दीपिका पादुकोणने लाँच केला तिचा सेल्फ केअर ब्रँड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -