Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन डिलिव्हरीनंतर अनुष्काचे बॉलीवूडमध्ये कम बॅक

डिलिव्हरीनंतर अनुष्काचे बॉलीवूडमध्ये कम बॅक

अनुष्का शर्माला शूट दरम्यान स्पॉट करण्यात आले.

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच कलाकारांनी प्रेग्नंसीच्या बातम्या दिल्या. दरम्यान, विराट आणि कोहलीला कन्यारत्न प्राप्त झाले. या डिलिव्हरीनंतर अनुष्काने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. नुकतेच अनुष्का शर्माला शूट दरम्यान स्पॉट करण्यात आले. डिलिव्हरीनंतर दोन महिन्यांनी अनुष्काने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. जानेवारीमध्ये अनुष्काने ‘वामिका’ला जन्म दिला. या डिलिव्हरीनंतर अनुष्काचे पुन्हा बॉलीवूडमध्ये कम बॅक झाले आहे. अनुष्काने डिलिव्हरीनंतरचा पुर्ण वेळ वामिकाला दिला असून, तिने मातृत्वाचा आनंद घेतला आहे. अनुष्का टायमिंगला बरेच महत्त्व देत असून, संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये तिची वेळ पाळण्याची सवय सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे शूटिंग सुरु होण्याच्या काही काळ अगोदर अनुष्का तिथे पोहचते. यावेळीही ती शूटिंगच्या अगोदर तिथे पोहचली असून, कुल लूकमध्ये व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडली. अशी चर्चा होती की, मे पासून ती नवा प्रोजेक्ट हातात घेईल मात्र अनुष्का अचानक एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची दिसली. यावेळी अनुष्का शर्मा एकदम फीट दिसली. सध्या ती जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकमध्येही अनुष्का शर्मा असण्याची शक्यता आहे.

याशिवाय अनुष्कानंतर अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानसुद्धा दुसऱ्यांदा आई-वडिल झाले. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर एका महिन्यांनी बेबोने म्हणजेच करीनानेसुद्धा शूटला हजर राहून तिच्या फिट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी करीनाला स्पॉट करण्यात आले. करीना एका सेलिब्रिटी कुकिंग शोच्या शूटिंगमध्ये होती. करीना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत दिसणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘महावसूली सरकार’ने जनतेला बनवले एप्रिल फूल; केशव उपाध्येंची टीका

- Advertisement -