घरताज्या घडामोडीNakul Mehta: अभिनेता नकुल मेहताच्या ११महिन्यांच्या बाळाला झाली कोरोनाची लागण,ICUमध्ये उपचार सुरू

Nakul Mehta: अभिनेता नकुल मेहताच्या ११महिन्यांच्या बाळाला झाली कोरोनाची लागण,ICUमध्ये उपचार सुरू

Subscribe

२४ तास हॉस्पिटलमध्ये सुफीची काळजी घेणे माझ्यासाठी फार कठीण होते. मीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने थकवा जाणवत होता. २ आठवड्यांपूर्वीच अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली.

मागच्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे आपण पाहत आहोत मात्र आता सेलिब्रेटींचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात आले आहे. अभिनेता नकुल मेहताच्या ( Nakul Mehta)  ११ महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण ( Nakul Mehta 11-month-old baby corona positive)  झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नकुलची पत्नी जानकी हिने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहित याविषयी माहिती दिली आहे. नकुलचा मुलगा सुफीवर कोविड आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

नकुलची पत्नी जानकीने फार भावूक पोस्ट लिहित तिचे अनुभव शेअर केले आहेत. २ आठवड्यांपूर्वीच अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली. त्याच्यानंतर पत्नी जानकीला देखील कोरोनाची लक्षणे दिसून लागली. तिची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. जानकीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलेय, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सुफीला देखील ताप येऊ लागला.त्याचा ताप १०४.२ वर गेला. तेव्हा मध्यरात्री त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले.माझ्या बाळासोबत कोविड आयसीयू वॉर्डमध्ये घालवणे फार कठीण होते. त्याला अँम्बुलन्सने हॉस्पिटलला नेल्यानंतर ताप कमी करण्यासाठी त्याला ३ IVS लावण्यात आल्या. रक्त चाचणी, RTPCR, सलाईनच्या बाटल्या, अँटीबायोटीक आणि इंजेक्शन देण्यात आली. हे सगळ पाहून मला प्रश्न पडला की माझ्या चिमुकल्या मुलामध्ये या सगळ्याला तोंड देण्याची शक्ती कुठून आली?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Jankee Parekh Mehta (@jank_ee)

- Advertisement -


जानकीने पुढे तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय, ‘३ दिवसांनी सुफीचा ताप उतरला. २४ तास हॉस्पिटलमध्ये सुफीची काळजी घेणे माझ्यासाठी फार कठीण होते. मीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने थकवा जाणवत होता. त्यावेळी सुफीची आया हॉस्पिटलमध्ये सुफीसोबत राहण्यासाठी तयार झाली तिचे उपकार मी कधीही विसरणार नाही’, असे जानकीने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे जानकीने सुफीवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत. ‘कोरोनाचा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट फार सौम्य असला तरी लहान मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. तुमच्या बाळाला मास्क लावल्याशिवाया बाहेर पाठवू नका, लहान मुलांचे लसीकरण करा आणि त्यांना सुरक्षित ठेवा’, असे आवाहन केले आहे. सुफी आता पूर्णपणे बरा झाला असून त्याच्यासोबतचे फोटो शेअर नकुलची पत्नी जानकीने तिचा अनुभव शेअर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरही Corona Positive, होम क्वारंटाईनचा निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -