घरमनोरंजनकुत्र्याला केली अमानुष मारहाण; बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी उठवला आवाज

कुत्र्याला केली अमानुष मारहाण; बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी उठवला आवाज

Subscribe

वरळीतील एका भटक्या कुत्र्याला सुरक्षारक्षकांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला असून वरळी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात एफआयआर दाखल केलं आहे.

मुक्या जनावरांना मारू नका त्यांच्यावर प्रेम करा असा अनेक मानवतेचा संदेश नेहमी सर्वत्र दिला जातो. पण या संदेशला काळींबा फासणारी अनेक लोक असतात. मुंबईतील वरळी येथे अशाच प्रकारे एक धक्कादायक घटना घडली आहे. वरळीच्या एका इमारती खाली मुसळधार पावसापासून स्वतःचा बचावर करण्यासाठी एक कुत्रात त्या इमारतीच्या छताखाली जात होता. पण त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी त्या कुत्र्याला बेदम अमानुष मारहाण केली.

या सर्व घटनेबाबत अॅनिमल राईट्सच्या संस्थापकांना आवाज उठवला आणि वरळी पोलीस स्टेशनमध्ये या मारहाणी विरोधात तक्रार दाखल केली. वरळी पोलिसांनी या सुरक्षारक्षक शंकर यादव आणि जवाहर जैस्वाल या दोघांनाही अटक केली आहे.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या घटनेचा अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी मुक्या जनावरांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे. अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्या मारहाण केलेल्या कुत्र्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिने त्या खाली ‘या मुक्या जनावराला ज्या व्यक्तीने अशी वागणूक दिली आहे. त्याविरोधात एफआयआर दाखल झालं आहे’, असं सोनमने सांगितलं आहे.

- Advertisement -

तर अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्या मारहाण झालेल्या कुत्र्याचा फोटो शेअर करून या घटने विरोधात लिहिलं आहे. ‘अशा प्रकारची घटना ही अमानुषतेचा कळस आहे. अशा वेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन जे स्वतःच्या न्यायासाठी आवाज उठवू शकत नाहीत. अशा मुक्या जनावरांना न्याय देण्याची आहे.’ असं तिने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -