घरताज्या घडामोडीमोनोक्रॉम ड्रेसमध्ये अभिनेत्री हुमा कुरैशीच्या तडकत्या फडकत्या अदा पाहून चाहते घायाळ

मोनोक्रॉम ड्रेसमध्ये अभिनेत्री हुमा कुरैशीच्या तडकत्या फडकत्या अदा पाहून चाहते घायाळ

Subscribe

ब्राइड रेड लिपस्टिक लावल्याने हुमा आणखीच स्टायलिश दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या हॉट अदा तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात. पुन्हा एकदा हुमा कुरैशी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या तिचे जांभळ्या मोनोक्रॉम ड्रेसमधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या काळात हुमा कुरैशी इतका भारी ड्रेस घालून चालली कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. हुमाचा सध्या नेटफ्लिक्सवर ‘आर्मी ऑफ द डेड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे सिनेमाचे ऑनलाईन प्रमोशन करताना हुमा दिसत आहे. तिच्या सध्याच्या ग्लॅमरस लुकमुळे हुमा सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.


हुमाने एकाच रंगाचा ड्रेस घातला आहे. हुमाने लाँग स्कर्टवर फक्त एक साधा क्रॉप टॉप घातला आहे. स्कटला पायाजवळ एक लहान कट दिला आहे. क्रॉप टॉपला एक गाठ मारली आहे. पफ स्लिव्हसमुळे हुमा आणखीच ग्लॅमरस दिसत आहे. त्याचबरोबर हुमाने स्मोकी आय मेकअप केला आहे. ब्राइड रेड लिपस्टिक लावल्याने हुमा आणखीच स्टायलिश दिसत आहे. हुमाने घातलेला ड्रेस फॅशनिस्टासाठी फार महाग नाहीय. झ्वान फॅशन ब्रँडचा हा ड्रेस आहे. याची किंमत १२ हजार ८०० रुपये इतकी आहे.

- Advertisement -

हुमाच्या या हॉट फोटोंमध्ये हुमाने केस मोकळे सोडले आहे. त्यामुळे तिच्या हॉटनेसला चार चाँद लागले आहेत. त्याचबरोबर तिने हातात ब्रेसलेट घातले आहे. गळ्यामध्ये चार लेअरचा एक नेकपिसही घातला आहे. हुमाच्या या फोटोंचे खास वैशिष्ट्य म्हणजे हुमाने सगळ्या फोटोंमध्ये जबरदस्त पोजेस दिल्या आहेत. हुमाच्या या फोटोंमुळे हुमा सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nude video घटनेची सल मनात ११ वर्षांनीही, राधिकाने ४ दिवस कोंडून घेतले होते

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -