अभिनेत्री ऋचा चड्ढाने केला भारतीय सेनेचा अपमान; सोशल मीडियावर युजर्सने घेतली शाळा

अभिनेत्री ऋचा चड्ढाने केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. ऋचावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऋचाने तिच्या ट्वीटमध्ये भारतीय सेनेच्या उत्तरी सेनेचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत चीनच्या सीमेचे गलवानमध्ये समोर आलेल्या एका जुन्या घटनाक्रमासोबत जोडले होते.

ऋचाने केला भारतीय लष्कराचा अपमान
ऋचाने केलेल्या ट्वीटला भारतीय जनता पार्टीने एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे तिने भारतीय लष्कराचा अपमान केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे. खरंतर, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, भारतीय सेना पाकिस्ताकडे असलेला काश्मीर परत घेण्यासाठी सज्ज आहे. भारत आम्हाला जो आदेश देईल तो आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. याचं व्यक्तव्याचा संदर्भ देत ऋचाने देखील ट्वीट केलं. त्यात तिने लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’, तिच्या या वादग्रस्त वक्यव्यामुळे अनेकांकडून तिच्यावर टिका केली जात आहे.

ऋचा चड्ढावर संतापले मनसिंदर सिंह

ऋचा चड्ढाच्या या ट्वीटवर भाजपाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्वीट करत लिहिलंय की, “अपमानास्पद ट्वीट ऋचा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची समर्थक आहे. त्यामुळे तिच्या या ट्वीटमध्ये भारत विरोधी विचार स्पष्ट दिसून येतात.त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे तिच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे.”

अनेक सोशल मीडिया यूजर्सने भारतीय सेनेची निंदा केल्याची आणि भारत-चीनमध्ये झालेल्या गलवानच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाची चेष्टा केल्याचा आरोप केला आहे.

 


हेही वाचा : 

अभिनेते कमल हसन यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात दाखल