घरमनोरंजनअभिनेते कमल हसन यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात दाखल

अभिनेते कमल हसन यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात दाखल

Subscribe

साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनाची छाप उमटवणारे दिग्गज अभिनेते कमल हासन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमल हासन यांना ताप आला होता. जेव्हा ते रुग्णालयातून हैदराबादमध्ये परतले होते तेव्हा त्यांना अवस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी कमल हासन हैदराबादमधून परतत होते. त्यावेळी त्यांना अचानक अवस्थ वाटू लागलं आणि तापही आला होता. हैदराबादमधून परतल्यावर त्यांना लगेच चेन्नईमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- Advertisement -

दरम्यान, कमल हासन सध्या त्यांच्या ‘इंडियन 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तसेच ते तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसतील. आगामी काळात ते मणिरत्नच्या ‘केएच 234’मध्ये देखील दिसून येणार आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -