Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष'च्या दिग्दर्शकाने केलं कृती सेननला किस; पुजाऱ्यांनी केला निषेध

तिरुपती मंदिर परिसरात ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने केलं कृती सेननला किस; पुजाऱ्यांनी केला निषेध

Subscribe

ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. लवकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होती ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची टीम जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच तिरुपतीमध्ये या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंटनंतर तिरुपती बालाजी मंदिर परिसरात एक मोठा प्रकार घडला. ज्यानंतर या मंदिराच्या पूजाऱ्यांनी ओम राऊत आणि कृतीवर टीका केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

7 जून रोजी तिरुपती बालाजी मंदिर परिसरात कृती सेनन आणि ओम राऊत उभे होते. यावेळी ओम राऊतने कृतीला बाय बोलताना किस केलं. पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या तिरुपती बालाजी परिसरात घडलेल्या या प्रकारावर मंदिरातील पूजाऱ्याने आपत्ती दर्शवली. ज्यामुळे आता नवा वाद सुरु झाला आहे. यावेळचा हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर टीका करत भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू यांनी ट्विट केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी हे ट्वीट हटवले.

- Advertisement -

ramesh naidu adipurush

 

- Advertisement -

पण या नेत्याच्या टीकेला पाठिंबा देत तिरुपती बालाजीच्या मुख्य पुजाऱ्यांनी लिहिलंय की, “हे निंदनीय कृत्य आहे. पती-पत्नीसुद्धा तिथे (मंदिरात) एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाऊ शकता. आणि तसे करू शकता. तुमचे हे वर्तन रामायण आणि देवी सीतेचा अपमान करण्यासारखे आहे.”

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

‘बाजीगर’पासून ‘धडकन’पर्यंत ‘हे’ आहेत शिल्पा शेट्टीचे सुपरहिट चित्रपट

- Advertisment -