बॉलिवूडमध्ये अजय देवगणला झाली ३० वर्ष पूर्ण; काय म्हणाला ‘या’ प्रवासाबद्दल वाचा

Ajay Devgn completes 30 years in bollywood
बॉलिवूडमध्ये अजय देवगणला झाली ३० वर्ष पूर्ण; काय म्हणाला 'या' प्रवासाबद्दल वाचा

बॉलिवूडचा सिंघम म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९१ मध्ये अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘फूल और कांटें’ या पहिल्या चित्रपटातून अजयने बाईकवरून धमाकेदार स्टंट करून एंट्री घेतल्यावर लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता. आज अजय देवगणच्या बॉलिवूडमधील या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिल्या चित्रपटापासून अजय देवगण स्टारडम पाहत आला आहे. त्याच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये खूप चढ-उतार आले आहेत. (Ajay Devgn 30 Years in Bollywood)

अजय देवगणमध्ये अजून चांगले चित्रपट करण्याची भूक आहे. सध्या अजयकडे ६ चित्रपट आहेत, जे २०२१ पासून २०२२पर्यंत प्रदर्शित होतील. यामुळेच सिद्ध होत की, अजय देवगण त्याच्या कामप्रती किती फोकस आहे. अजयने ॲक्शन, कॉमेडीपासून रोमँटिक चित्रपटात काम केले आहे. १९९८ मधील ‘जख्म’ आणि २००२ मधील ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटासाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

बॉलिवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिंदुस्तान टाईम्समध्ये दिलेल्या मुलाखतीत अजय म्हणाला की, ‘बॉलिवूडमध्ये ३० वर्ष टिकून राहणे खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात तीन दशके टिकून राहण्यासाठी सतत विकास करण्याची गरज आहे. त्यासाठी विशिष्ट पातळीची परिपक्वता आवश्यक आहे. हे केवळ वयासाठीच नाही तर तुमच्या कलाकुसरीसाठीही महत्त्वाचे असते. शिवाय यासोबत काम करणारे सहयोगी आणि फिल्ममेकरकडून शिकणे गरजेचे आहे. हे कधीही न संपणारी शिकण्याची प्रक्रिया आहे.’

बॉलिवूडमधील एंट्रीबाबत अजय म्हणाला की, ‘वडील वीरू देवगण मला अभिनेता बनवू इच्छित होते. त्यामुळे मला त्यांच्या स्वप्नावर फोकस करायचे होते. मला जे करायला सांगितले, तेच मी करत गेलो. ‘फूल और कांटे’ जेव्हा हिट झाला होता तेव्हा मी स्टारडमसाठी प्रेरित झालो. मी स्टारडमसाठी अजिबात तयार झालो नव्हतो. हे पालकांचे आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम होते.’

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘बाहुबली’ दिग्दर्शक राजामौलीच्या दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटात अजय दिसणार आहे. ७ जानेवारी प्रदर्शित होण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे. तसेच संजय लीला भंसाळीचा ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘मई डे’, ‘मैदान’, ‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण दिसणार आहे. शिवाय अजय देवगणचा ‘दुष्यम २’ सध्या प्री-प्रोडक्शनाच्या स्टेजमध्ये आहे.


हेही वाचा – Aamir Khan Third Wedding: सहाय्यक अभिनेत्रीसोबत आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लग्नगाठ!