आईची खूप आठवण येते – अक्षय कुमार

आईची प्रकृती नाजूक असल्याचे कळतास अक्षय सिंड्रेला सिनेमाचे शुटींग अर्धवट टाकून आईकडे आला होता

Akshay kumar share emotional video in memory of her mother
आईची खूप आठवण येते - अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार सूर्यवंशी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयच्या चाहत्यांसाठी सूर्यवंशी हा सिनेमा फार खास असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत.अक्षय सध्या सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सर्वत्र अक्षय सिनेमाचं प्रमोशन करताना दिसतोय. एकीकडे सिनेमाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अक्षय मात्र त्यांच्या आईच्या आठवणीत भावूक झाला आहे. अक्षयच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आईची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओत अक्षय फारच भावूक झाल्याचे दिसत आहे. अक्षयला भावूक झालेले पाहून त्याच्या चाहत्यांनी देखील त्याचे सांत्वन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयची आई अरुणा भाटीया यांचे गेल्या महिन्यातच निधन झाले. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. आईची प्रकृती नाजूक असल्याचे कळतास अक्षय सिंड्रेला सिनेमाचे शुटींग अर्धवट टाकून आईकडे आला होता.

अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षय कुमार समुद्रकिनारा किंवा बोटीत असल्याचे दिसत आहे. अक्षय कॅमेरात न पाहता बाजूला पाहताना दिसत आहे. त्याने डोळ्यावर गॉगल लावला आहे. २० सेकंदाच्या व्हिडिओत नमस्तस्यै नमो नम: हे म्युझिक वाजत आहे.

आईच्या निधनानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यात त्याने असे म्हटले होते की, मी माझ सर्वस्व होती. तिच्या जाण्याने माझ्या ह्रदयाला असह्य वेदना झाल्या आहेत. आईने आज या जगाचा निरोप घेतला आणि माझ्या वडिलांच्या दुसऱ्या जगात ती गेली आहे. तिच्या आत्म्यास शांती लाभो असे अक्षयने म्हटले होते.


हेही वाचा – नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही, कोर्टाचा निकाल