अखेर अक्षय कुमार The Kapil Sharma Show मध्ये जाणार, नाराजीच्या एपिसोडवर अखेर पडदा

सगळं काही चांगले असून लवकरत अक्षय आणि मी बच्चन पांडेचे शुटींग करणार आहोत. अक्षय पाजी माझा मोठा भाऊ आहे आणि तो माझ्यावर कधीही रागवू शकत नाही

Akshay Kumar will become in The Kapil Sharma Show for promoting bachchan pandey movie
अखेर अक्षय कुमार The Kapil Sharma Show मध्ये जाणार, नाराजीच्या एपिसोडवर अखेर पडदा

‘द कपिल शर्मा या शो’ (The Kapil Sharma Show)  विषयी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पहायाला मिळते. देशाच्या कानाकोपऱ्यात कपिल शर्मा शोचा चाहता वर्ग आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये आलेला प्रत्येक कलाकार पोट दुखेपर्यंत हसल्याशिवाय आणि प्रेक्षकांना हसवल्याशिवाय जात नाही. असाच एक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय आजवर अनेक वेळा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये आला आहे. कपिल आणि अक्षय यांच्या फार चांगली मैत्री आहे. मात्र त्यांच्या मैत्रीला दृष्ट लागली आणि अक्षय कुमारने त्याच्या आगामी बच्चन पांडे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो मध्ये येण्यास नकार दिला. कपिल आणि अक्षयमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या मात्र आता दोघांच्या भांडणाच्या एपिसोडवर पडदा पडला असून अक्षय लवकरच बच्चन पांडे च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणार आहे. कपिलने स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. नेमकं दोघांमध्ये काय झाले? पाहूयात.

नेमकं काय झालं होतं ? 

काही दिवसांर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. दरम्यान या मुलाखतीची जोरदार चर्चा झाली होती. कॉमेडिन कपिल शर्माने अक्षय कुमराची त्या मुलाखतीवरून खिल्ली उडवली होती. अक्षयवर हास्यास्पद टिप्पणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या घटनेनंतर कपिल शर्मावर अक्षय कुमार नाराज असल्याचं बोललं जातंय. अक्षयने एपिसोडमधील ती दृश्य न दाखवण्याची रिक्वेस्ट टीमला केली होती मात्र तो एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला. कपिल आणि चॅनलतर्फे अक्षयला शब्द देण्यात आला मात्र हा भाग इंटरनेटवर व्हायरल झाला. या घटनेवरून अक्षय कुमार कपिल शर्मावर नाराज शोमध्ये देखील हजेरी लावणार नसल्याचं सांगितले जात होते.

 

काय म्हणाला कपिल शर्मा ?  

मात्र दोघांमधील वाद आता मिटला असून कपिलने ट्विट करत याचा खुलासा केलाय, त्याने म्हटलेय, ‘मित्रांनो मी मीडियावर अक्षय पाजी आणि माझ्याविषयीच्या सगळ्या बातम्या वाचत होतो. मी आताच अक्षय पाजीसोबत बोलणे झाले आणि सगळं काही सॉर्ट झाले आहे. हे केवळ एक मिसकम्युनिकेशन होते. आता सगळं काही चांगले असून लवकरत अक्षय आणि मी बच्चन पांडेचे शुटींग करणार आहोत. अक्षय पाजी माझा मोठा भाऊ आहे आणि तो माझ्यावर कधीही रागवू शकत नाही’.

कपिल शर्मा आणि अक्षय कुमार यांच्या बॉन्डिंगविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. कपिलच्या शोमध्ये हजेर लावल्यानंतर दोघांमध्ये कॉमेडीची खास मैफील रंगते असं म्हणायला हरकत नाही.

अक्षय कुमरच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचे झाल्यास अक्षय सध्या त्याच्या आगामी रक्षाबंधन, पृथ्वीराज, गोरखा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयने अतरंगी रे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान आता कपिल आणि अक्षयच्या मैत्रीतील नाराजीचा पडदा मिटला असून अक्षय कपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच हजेरी लावणार आहे.


हेही वाचा – Sonu Sood To Host Rodies : ‘रोडीज’मधून रणविजय ‘एक्झिट’ तर सोनू सूदची…