घरमनोरंजनVideo: अक्षय कुमारला 'चढ गयी है' !

Video: अक्षय कुमारला ‘चढ गयी है’ !

Subscribe

गोल्ड या आगामी सिनेमातील 'चढ गयी है' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात 'मुझे चढ गई है' अक्षय कुमार धमाल ठुमके लगावताना दिसत आहे. 'गोल्ड'च्या या नव्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

अभिनेता अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातील दुसरं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘चढ गई है’ असे या गाण्याचे शब्द असून गाण्यामध्ये खिलाडी कुमारचा धमाल अंदाज पाहायला मिळतो आहे. गोल्ड सिनेमातील 
नुकतंच काही दिवसांपूर्वी  ‘गोल्ड’ चित्रपटातील ‘नैनो से बांधी’ हे गाणं प्रदर्शित करण्यात झालं होतं. या गाण्यातील अक्षय आणि मौनी रॉयच्या रोमँटिक केमिस्ट्रीला आणि ठुमक्यांना नेटिझन्सची भरभरुन पसंती मिळाली होती. अक्षयनं हे गाणं ट्विट करत आपलं आवडतं गाणं असल्याचं सांगितलं. तर मौनीनं आपल्या अकाऊंटवरून या वेळचे काही क्षण पोस्ट केले होते.
gold movie song
‘नैनो से बांधी’ गाण्यातील दृष्य
‘गोल्ड’ हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या ऑलिम्पिक गोल्डची कथा आहे. या चित्रपटातून प्रथमच ‘नागिन’ मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली मौनी रॉय मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात अक्षय कुमारनं असिस्टंट मॅनेजर ‘तपन दास’ ची भूमिका साकारली आहे. तर अक्षय आणि मौनीबरोबर या ‘गोल्ड’मध्ये कुणाल कपूर, अमित साध आणि विनीत कुमार यांच्यादेखील भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून सध्या त्याची गाणी प्रदर्शित होत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -