Busan International Film Festival : आंतरराष्ट्रीय ‘बुसान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अली फजलची बाजी

ali fazal nominationted for ray movie in busan film festival
Busan International Film Festival : आंतरराष्ट्रीय 'बुसान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अली फजलची बाजी

बॉलिवूड अभिनेता अली फजल याने आंतरराष्ट्रीय ‘बुसान फिल्म फेस्टिव्हल’च्या एशिया कंटेंट अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत स्थान पटकावले आहे. नेटफिल्सवर रिलीज झालेल्या ‘फॉरगेट मी नॉट सेगमेंट’ या सिरिजमधील ‘इस्पित नायर’ या भूमिकेसाठी अली फजलला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे.

या नामांकनानंतर अली फजलने प्रतिक्रिया देत सांगितले की, हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. मला नामांकन दिल्याबद्ल मी आभारी आहे. एशिया कंटेंट अवार्डससाठी माझे नाव जाहीर होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यावर्षी भारतात अनेक दर्जेदार कंटेंट निर्माण करण्यात आले. अशा जगप्रसिद्ध अवॉर्डससाठी नामांकन मिळणे हे एका चित्रपटासाठी तसेच अभिनेत्याच्या प्रभावशाली जीवनातील अधिक सन्मानाची गोष्ट असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)


श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित ही सिरीज यांच्या ‘बिपिन चौधरी का स्मृती भ्रम’ या कथेवर आधारित आहे. यात अली फजलने कॉर्पोरेट क्षेत्रात शार्क माशाप्रमाणे वागणाऱ्या अतिशय विकृत अशा ऑफिसरची भूमिका निभावली आहे. जो कोणत्याही गोष्टी विसरत नाही, त्यामुळे त्याची स्मरणशक्ती एका संगणकाप्रमाणे असते.

तिसरा एशियन कंटेंट अवॉर्ड्स (ACA) बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (BIFF) च्या एशियन कंटेंट अँड फिल्म मार्केट (ACFM) द्वारे चालवला जातो. ACA चे लक्ष्य उत्कृष्ट टीव्ही, ओटीटी आणि आशियातील ऑनलाइन कंटेंटला प्रदर्शित करणे आहे. यावर्षी एसीएवर कोरियन नाटक आणि नेटफ्लिक्स ओरिजिनल्सचे वर्चस्व राहिले आहे.