Baiju Bawra : भन्साळींच्या ‘बैजू बावरा’मध्ये आलिया-रणवीरची एन्ट्री

Alia bhatt to be start sanjayleela bhansali next baiju bawra
भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये आलिया-रणवीरची वर्णी

बॉलिवूड चित्रपट ‘गली बॉय’च्या घवघवीत यशानंतर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दोघेही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यक्त आहेत. मात्र ही जोडी पुन्हा एका नव्या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रणवीर आणि आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित “बैजू बावरा’चे शूटिंग सुरु करणार आहेत. 2022 या वर्षाच्या मध्यापर्यंत दोघेही या चित्रपटावर काम सुरु करतील.

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बैजू बावरा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर-दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र रिपोर्टनुसार, भन्साळी रणबीर-दीपिकासोबत हा ड्रीम प्रोजेक्ट बनवणार होते. या चित्रपटासाठीही त्याची पहिली पसंती दोघांना होती. मात्र, दोघांनीच्या बिझी शेड्यूलमुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर भन्साळींनी रणवीर-आलियासोबत हा चित्रपट बनवण्याची योजना आखली आहे.

वृत्तानुसार, भन्साळी ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज आहेत. दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या पोस्ट प्रोडक्शननंतर ते ‘बैजू बावरा’ चित्रपटावर काम करण्यास उत्सुक आहेत. सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्यातर 2022 च्या मध्यापर्यंत ते या चित्रपटावर काम सुरु करतील.

भन्साळी ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा सेट एका मोठ्या स्टुडिओमध्ये तयार करणार असून एकाच वेळी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतील. या चित्रपटाचे शुटिंग 7-8 महिने चालणार आहे, ज्यासाठी त्याची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक भव्य सेट तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान बैजू बावरा चित्रपटासाठी रणवीर आणि आलियाचे नावे निश्चित झाले असून चित्रपटातील कास्टिंगचे काम अद्याप सुरू आहे. भन्साळी आणखी एका लीड अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे. ‘रॉकी और राणी’ या आगामी चित्रपटाची लव्हस्टोरीवरील काम संपताच रणवीर-आलिया भट्ट ‘बैजू बावरा’ सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.


Celebrity wedding : अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार ; लग्नासाठी ठरले ‘हे’ ठिकाण