Maharashtra Sadan Scam : छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला हायकोर्टात आव्हान, अंजली दमानियांचा मानहानीचा दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील निर्दोष मुक्त निर्णयाला आव्हान दिलं असल्याची माहिती दिली आहे.

Chhagan Bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात आता छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढणार आहेत. हायकोर्टात कोरोनाच्या पार्श्वभमीवर तातडीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात येत आहे. यामुळे छगन भुजबळ यांच्याविरोधातील याचिकेवर महिन्याभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष मुक्त केलं आहे. यानंतर भुजबळ यांनी एसीबी कोर्टाकडे आपल्याल दोषमुक्त करण्यात यावे आणि नाव वगळण्यात येण्यासाठी अर्ज दाखल केला होता. भुजबळ यांच्यासोबत त्यांच्या पुतण्याचेही नाव या प्रकऱणात आहे. त्यानेही अर्ज केला होता.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील निर्दोष मुक्त निर्णयाला आव्हान दिलं असल्याची माहिती दिली आहे. दमानिया यांनी ट्विट केलं आहे की, भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला भ्रष्टाचार विरोधी कार्यालयाने आव्हन दिलं नाही. यामुळे कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयाला आव्हान दिलं आहे. असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

निर्दोष मुक्तीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

कोर्टाने दोषमुक्त केल्यानंतर ‘सत्य परेशान होता है पराजित नही’ अशी पहिली प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली. जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे सांगतानाच, तुमचा भुजबळ करू असे म्हणणार्‍यांनाही त्रास होणार आहे, असा टोलाही भुजबळ यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला आहे.


हेही वाचा : महाराष्ट्र सदन घोटाळा : कोर्टाकडून छगन भुजबळ दोषमुक्त