घरमनोरंजनआलिया-रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

आलिया-रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

Subscribe

सध्या अनेक प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे आहे. जास्त पाहायला मिळतो. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा अनेकजण तो ओटीटी पाहतात. दरम्यान, येत्या काही दिवसांत अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या ओटीटीवर होणार चित्रपट प्रदर्शित
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली असून आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल असं सांगितलं जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. येत्या 23 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या एक दिवस आधी हा प्रदर्शित होऊ शकतो.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसून आले. तसेच यामध्ये अभिनेता शाहरूख खान सुद्धा चित्रपटात कॅमियो रोलमध्ये दिसून आला. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट झाला होता. हा हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता.

2022 मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट
2022 मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 360 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ज्याने 190 कोटींची कमाई केली होती.

- Advertisement -

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.


हेही वाचा :

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला हत्या म्हणणाऱ्या वैशाली ठक्करच्या आत्महत्येचे गूढ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -