घरमनोरंजनआम्ही काहीही लपवलेलं नाही... मलायका अरोराच्या प्रेग्नेंसीच्या अफवेवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

आम्ही काहीही लपवलेलं नाही… मलायका अरोराच्या प्रेग्नेंसीच्या अफवेवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. हे दोघेही मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण, या दोघांनीही अजून त्यांच्या लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही. अशातच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलायका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली होती. या अफवा व्हायरल झाल्यानंतर, अभिनेता अर्जुन कपूरने मलायकाच्या प्रेग्नेंसीच्या खोट्या बातम्या चालवणाऱ्या एका प्रकाशनाची शाळा घेतली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूर याप्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने याप्रकरणाबाबत सांगितले की, अशा प्रकारची नकारात्मकता पसरवणं सोप्प आहे. कारण, यामुळे लोकांचे लक्ष आकर्षित होते आणि हे काही वेळ असचं सुरु राहतं. यासोबतच अर्जुन कपूर म्हणाला की, कलाकरांचे खासगी आयुष्य कधीही खासगी नसते आणि त्यांना यासोबतच जगावे लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

- Advertisement -

पुढे अर्जुन म्हणाला की, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकार मीडियावर अवलंबून असतात. परंतु काहीही लिहिण्याआधी पत्रकरांनी कलाकारांशी बोलायला हवं, आम्ही आत्तापर्यंत आमचा आयुष्यातील कोणतीच गोष्ट लपवलेली नाही.

दरम्यान, यापूर्वी अर्जुन कपूर कुत्ते चित्रपटामध्ये दिसला होता. आस्मान भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूरसोबत तब्बू आणि राधिका मदन देखील मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट 13 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता.


हेही वाचा :

तेलंगणात ‘पुष्पा 2’ च्या टीमचा बस अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -