Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अर्जुन रामपालचा नवा लुक व्हायरल

अर्जुन रामपालचा नवा लुक व्हायरल

सेलिब्रिटी हेयर ड्रेसर आलिम हाकीम याच्या सलूनमधून नवा कोरा लुक करुन अर्जुन बाहेर येत असतानाच त्याला पॅपरॅझिने स्पॉट केलं होतं

Related Story

- Advertisement -

कलाकारांना नेहमी त्यांच्या लुक्सवर,फिटनेसवर,आहारावर विषेश लक्ष द्यावे लागते किंबहुना त्यांच्या लाइफस्टइल स्टेटसवर विषेश लक्ष केंद्रीत करावे लागते. सोशल मीडीयाचा जमाना असल्यामुळे प्रत्येक लोकांची स्टारवर नजर असते यासाठी स्टांरना नेहमी अपडेट राहवं लागतं. अशातच बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या अभिनयासोबत त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखला जातो. सध्या मात्र अर्जुन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हि़डीओतील अर्जुनचा हटके लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असुन. अर्जुन त्याच्या नव्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अर्जुन एखाद्या ह़ॉलिवूड स्टार दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. तसेच त्याच्या चाहत्यांनी या नव्या लूकला पसंती दिली आहे. सध्या अर्जुनचे कमेंट बॉक्स त्याच्या कौतुकाने भरलेले आहे.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुनला ओळखणंही अनेकांना कठिण होतंय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

अर्जुनने नवी हेअर स्टाइल केली असून त्याने केसाला प्लॅटिनम कलर केला आहे. अर्जुनचा हा प्लॅटिनम ब्लाँड लूक पाहून अनेकाना हा अर्जुनचं आहे का? असा प्रश्न पडला आहे. सेलिब्रिटी हेयर ड्रेसर आलिम हाकीम याच्या सलूनमधून नवा कोरा लुक करुन अर्जुन बाहेर येत असतानाच त्याला पॅपरॅझिने स्पॉट केलं होतं. सध्या सोशल मीडियावर अर्जुनच्या या लुकची भारिच चर्चा रंगली आहे.


- Advertisement -

हे  हि वाचा – सायली संजीववर चढला हळदीचा रंग

- Advertisement -