घरताज्या घडामोडीAryan Khan Drugs Case: आर्यनच्या जामिनाबाबत पाच पानी आदेश जारी; १ लाखाच्या...

Aryan Khan Drugs Case: आर्यनच्या जामिनाबाबत पाच पानी आदेश जारी; १ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काल, गुरुवारी हायकोर्टातून जामीन मिळाला. त्यानंतर आज, शुक्रवारी आर्यनच्या जामिनाबाबत पाच पानी आदेश जारी करण्यात आले आहेत (Bombay HC releases 5-page order with bail conditions). त्यामुळे आज आर्यन खानची २५ दिवसांनंतर आर्थर रोड जेलमधून सुटका होऊ शकते. आर्यनसह तीन आरोपींचा जामीन अर्जाला काल मुंबई हायकोर्टाने मंजूरी दिली होती. या सर्व आरोपींना अटीशर्थींसह जामीन मंजूरी करण्यात आला आहे.

आज दुपारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खानसाठी पाच पानांचा आदेश जारी केला. आर्यनचा १ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार, आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते २ या वेळेत उपस्थित हजर राहायचे आहे. तसेच कोर्टातील सुनावणीसंदर्भात कोणते वक्तव्य आर्यन करू शकत नाही. आर्यनने तत्सम कोणत्याही कामात गुंतू नये, सहआरोपींशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नये आणि तत्काळ विशेष न्यायालयासमोर पासपोर्ट जमा करावा लागेल. शिवाय आर्यन एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाही.

- Advertisement -

गुरुवारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावर बऱ्याच काळ सुनावणी पार पडली होती. गेल्या दिवसांपासून आर्यनसह तीन आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. या आरोपींना जामीन न मिळण्यासाठी तपास यंत्रणा एनसीबीने खूप प्रयत्न केला. परंतु शाहरुख खानने वरिष्ठ वकिलांनी फौज कोर्टात उभी करून आपल्या लेकाचा जामीन मंजूर केला. आर्यनच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे लढत होते. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखच्या मन्नत बाहेर दिवाळीसारखे वातावरण झाले होते. मन्नतच्या बाहेर फडाके फोडण्यात. माहितीनुसार, आर्यन आणण्यासाठी दोन गाड्या जेलमध्ये रवाना झाल्या आहेत.


हेही वाचा – Aryanला बेल मिळताच गौरीला अश्रू झाले अनावर; अक्षय-सलमानने शाहरुखला दिल्या शुभेच्छा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -