घरमनोरंजनअश्विनी भावेला 'या' कारणामुळे आली 'सैनिक'ची आठवण

अश्विनी भावेला ‘या’ कारणामुळे आली ‘सैनिक’ची आठवण

Subscribe

अभिनेत्री अश्विनी भावेने २५ वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या 'सैनिक' चित्रपटाची आठवण काढत आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

अभिनेत्री अश्विनी भावे हिने मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. एकेकाळी हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज कलाकारांसोबत अश्विनी हिने स्क्रिन शेअर केलं आहे. अशाच एका चित्रपटाची आठवण आज अश्विनीला होत आहे. १९९३ साली प्रदर्शीत झालेल्या ‘सैनिक’ चित्रपटाबाबत अश्विनीने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक मेसेस दिला आहे. स्वतःचा व्हिडिओ बनवून तिने हा ट्विटरवर अपलोड केला आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानाची गोष्ट दाखवण्यात आलेल्या ‘सैनिक’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार याने प्रमुख भूमिका साकारली आहे.

काय आहे नेमकं व्हिडिओत

 अश्विनीने एका फौजीच्या मागे खंबीरपणे उभी असलेल्या त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. त्याशिवाय चित्रपटात अनुपम खेर, फरहिन, लक्ष्मीकांत बेर्डे, गुड्डी मारूती, सतीश शहा, रोनित रॉय यांच्याही व्यक्तीरेखा पाहायला मिळतात. १० सप्टेंबर १९९३ रोजी प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अश्विनीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये तिने चित्रपटाच्या चित्रकरणाच्या वेळेची मजा-मस्ती, धमाल किस्से तिने या व्हिडिओत सांगितले आहे. शिवाय आपल्या ‘अकला’ या व्यक्तीरेखेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले असून आजही ती व्यक्तीरेखा चाहत्यांच्या लक्षात असल्याचे अश्विनी सांगते. त्यासाठी तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

अक्षय कुमारच्या देशभक्तीपर चित्रपटांची सुरूवात 

सामाजिक जाणिव असलेला अभिनेता म्हणून हिंदी सिनेसृष्टीत अक्षय कुमारची वेगळी ओळख बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षय सातत्याने देशभक्ती वर आधारीत चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’, ‘पॅडमॅन’, ‘गोल्ड’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र १९९३ सालीच अक्षयने सैनिक मध्ये काम करून देशभक्तीपर चित्रपट करण्यास सुरुवात केली होती.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -