अथिया शेट्टी आणि केएल राहुल जर्मनीसाठी रवाना; मुंबई एअरपोर्टवर दोघे एकत्र स्पॉट

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालेले अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे जर्मनीला जात आहेत

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल या दोघांनी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याची घोषणा केली होती. हे दोघेही वारंवार आपल्या सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेमाचे दाखले देत असतात. रविवारी या दोघांनाही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा जर्मनी दौरा

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालेले अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे जर्मनीला जात असून जर्मनीमध्ये केएल राहुल आपल्या कंबरेला झालेल्या जखमेची सर्जरी करणार आहे. या जखमे मुळेच केएल राहुल इंग्लंड दौऱ्यासाठी जाऊ शकला नाही. जर्मनीमध्ये हे दोघेही जवळपास एका महिन्यापर्यंत राहणार आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं नातं

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

गेल्या तीन वर्षापासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत. जेव्हापासून या दोघांनी आपल्या नात्याची घोषणा केली होती, तेव्हापासून हे दोघे एकत्र दिसून येतात. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी मागील काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पाली हिल येथील एका बिल्डिंगमध्ये एक फ्लोअर खरेदी केला आहे.

अथिया शेट्टीचं करिअर
अथियाने २०१५ मध्ये ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. तसेच ती २०१९ मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती.


हेही वाचा :अरूंधती सोडणार ‘आई कुठे काय करते’ मालिका? सोशल मीडियावर चर्चा सुरू