अरूंधती सोडणार ‘आई कुठे काय करते’ मालिका? सोशल मीडियावर चर्चा सुरू

सीनमध्ये अरूंधती कुठेही दिसत नाही. अरूंधती या सीनमध्ये दिसत नसल्याने अरूधंतीने मालिका सोडली असे अनेकजण म्हणत आहेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेचा खूप मोठ्ठा चाहता वर्ग निर्माण झाला असून मालिकेतील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून वारंवार कौतुक सुद्धा होत असते. तसेच या मालिकेतील अरूंधती ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तिच्या मालिकेतील संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना खूप भावला आहे. सध्या ही मालिका एका नव्या वळणावर येऊन पोचली असली तरी सूत्रांच्या माहितीनुसार, अरूंधती ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अनिरूद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य सुद्धा दिसत आहेत. पण या सीनमध्ये अरूंधती कुठेही दिसत नाही. अरूंधती या सीनमध्ये दिसत नसल्याने अरूधंतीने मालिका सोडली असे अनेकजण म्हणत आहेत. मात्र निर्मात्यांनी खुलासा केला आहे की, अरूंधती ही मालिका सोडणार नसून ती काही काळासाठी वैयक्तीक कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेत आहे. दरम्यान अरूंधतीने ब्रेक घेतल्यामुळे निर्माते सध्या अनिरूद्ध आणि संजनावर जास्त फोकस करणार आहेत.

मात्र बरेच दिवस अरूंधती मालिकेत दिसत नसल्याने अरूंधतीने मालिका सोडली असं अनेकांना वाटत होते. याबाबत सोशल मीडियावरही खूप चर्चा सुरू होत्या. पण आता अरूंधतीने मालिका सोडली नसून काही काळासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे, हे कळताच प्रेक्षकांना हायसं वाटलेलं आहे. येत्या काळात लवकरच अरूंधती पुन्हा मालिकेत परतणार आहे.


हेही वाचा :महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा,रंगणार ११ लाखाच्या पैठणीसाठी चुरस