घरमनोरंजन'अवतार 2' ने जगभरातून केला 14000 कोटींचा टप्पा पार; भारतातही रेकॉर्ड ब्रेक...

‘अवतार 2’ ने जगभरातून केला 14000 कोटींचा टप्पा पार; भारतातही रेकॉर्ड ब्रेक कमाई

Subscribe

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, 26 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत निव्वळ 438 कोटी तर एकूण 454 कोटींची कमाई केली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने कमावले इतके कोटी

- Advertisement -

जेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 193.6 कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 100 कोटी कमावले होते. तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 59.85 कोटी कमावले असून चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 4.19 कोटी कमावले दरम्यान आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 438 कोटी कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 14060 कोटी कमावले आहेत.

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘पठाण’ वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया म्हणाला… कलाकार म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -