Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'डॉक्टर जी'मध्ये आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंह झळकणार एकत्र

‘डॉक्टर जी’मध्ये आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंह झळकणार एकत्र

Subscribe

आयुष्मान खुरानाने त्याच्या 'डॉक्टर जी' आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता आयुष्मान खुरानाने मागील काही वर्षांपासून एकानंतर एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम करत आपली ओळख निर्माण केली आहे. अशातच आयुष्मान खुरानाने त्याच्या ‘डॉक्टर जी’ आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

 नुकत्याच काही वेळापूर्वी आयुष्मानने ‘डॉक्टर जी’ची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करत आयुष्मानने लिहिलंय की, “माझं आयुष्य गुगलीने भरलेलं आहे. ऑर्थोपेडिक्सवर तयार झाला डॉक्टर जी, आपल्या अपॉइंटमेंट्साठी तयार राहा. ‘डॉक्टर जी’ 14 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित” दरम्यान, या चित्रपटामध्ये आयुष्यमानने एका ज्ञ्नेकोलोगिस्टची भूमिका साकारलेली आहे. तसेच रकुल प्रीत सिंह चित्रपटात डॉ फातिमा सिद्दीकी आणि शेफाली शाह डॉ.नंदिनी श्रीवास्तव आणि शीबा चड्ढा आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

हा चित्रपट पुढट्या महिन्यातील 14 तारखेला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या लूकने प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूति कश्यपने केलं आहे. ‘डॉक्टर जी’मध्ये आयुष्मान एका मेडिकल विद्यार्थ्याच्या भूमिकेत असणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘नेबर्स’ चित्रपट 23 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -