घरमनोरंजन'हिंदी चित्रपटांपेक्षा 'बाबा' हा चित्रपट सरस'

‘हिंदी चित्रपटांपेक्षा ‘बाबा’ हा चित्रपट सरस’

Subscribe

“माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट सरस आहे. '

दिपक दोब्रीयाल यांनी ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ हा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. ते म्हणतात की, त्यांची बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला! त्यांच्या दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान त्यांना या चित्रपटाने दिले, असेही दोब्रीयाल सांगतात.

- Advertisement -

दीपक दोब्रियाल हे राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. या चित्रपटाची संयुक्त निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यु मस्टँग क्रिएशन्सने केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करताना दीपक दोब्रियाल म्हणतात, “इथे मला एवढे प्रेम मिळाले कि, मी मराठी चित्रपटात काम करत आहे असे मला वाटळेच नाही. जेथे भरभरून सर्जनशील काम होते अशा एका चित्रपटसृष्टीत काम करण्याचा करण्याची संधी मला मिळते आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मराठीतील चित्रपट पाहिल्यावर या चित्रपटसृष्टीचे वेगळेपण लक्षात येते.”

- Advertisement -

‘बाबा’ हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाबद्दल बोलताना दोब्रीयाल म्हणाले, “माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट सरस आहे.

या चित्रपटात दीपक दोब्रियाल यांच्या व्यतिरिक्त नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -