बच्चन कुटुंबीयांनी साजरा केला रक्षाबंधन सण; आराध्याने बांधली अगस्त्यला राखी

सोशल मीडियावर कलाकारांच्या रक्षाबंधनाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामध्ये स्टारकिड आराध्या बच्चन आणि अगस्त्यच्या रक्षाबंधनाचे फोटो समोर आले आहेत.

रक्षाबंधनाचा सण बहिण भावासाठी खास असतो. हा दिवस बहिण भावामधील अतूट प्रेम दर्शवतो. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी सर्वसामान्यांपासून ते अनेक कलाकारापर्यंत सर्वजण रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर कलाकारांच्या रक्षाबंधनाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामध्ये स्टारकिड आराध्या बच्चन आणि अगस्त्यच्या रक्षाबंधनाचे फोटो समोर आले आहेत.या फोटोंमध्ये आराध्यासोबत ऐश्वर्या देखील दिसत आहे. आराध्या तिच्या आत्याचा मुलगा अगस्त्यच्या हातामध्ये राखी बांधत आहे.

तर, दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसत आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन, जया, अभिषेक, ऐश्वर्या, श्वेता, अगस्त्य, नव्या आणि आराध्या हे सगळे दिसत आहेत. या फोटोमध्ये सर्व कुटुंबीय आनंदात दिसत आहेत.

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाचा मुलगा आहे. अगस्त्य नंदा द आर्चीज मधून शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि खुशी कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दाखवला जाईल.


हेही वाचा :24 ऑगस्टपासून ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला