Bigg Boss 13 : ‘सिद्धार्थने दिलेली अॅसिड फेकण्याची धमकी’ आणि…शिल्पाने केला धक्कादायक खुलासा!

नुकताच बिग बॉस १३ चा फिनाले पार पडला. सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस १३ चे विजेतेपद जिंकले. मात्र सिद्धार्थचा आणि त्याच्या फॅन्सचा आनंद फार काळ टिकणार नाहीये. कारण बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेने सिद्धार्थवर अनेक आरोप केले आहेत. सिध्दार्थ शुक्ला आणि तीच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. बिग बॉस १३ च्या आधी शिल्पा आणि सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सिद्धार्थबरोबर रिलेशनशीपमध्ये असणं किती कठीण होतं याविषयी अनेक खुलासे शिल्पाने केले आहेत.

शिल्पा म्हणते, सिद्धार्थने मला अनेकदा शिव्या आणि मारपीट केली. आमच्यात खूप भांडण व्हायची. सिध्दार्थने मला माझ्यावर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली होती. सिद्धार्थ हा खूपच पजेसिव्ह आहे. जेव्हा आम्ही रिलेशनमध्ये होतो, तेव्हा जर मी त्याचा कॉल नाही उचलला तर तो मला शिव्या घालायचा. पण जेव्हा सिद्धार्थ फोन उचलायचा नाही तेव्हा मी त्याला प्रश्न विचारला तर मला मार खावा लागायचा, शिव्या खाव्या लागायच्या. वाईटतलं वाईट माझ्याबाबतीत घडत होतं.

पण मी गप्प बसले नाही. मी पोलिसात तकरार केली होती. कारण तो मला म्हणायचा, मला सोडून दाखव मी तुझ्यावर अॅसिड टाकेन. मी तुझं आयुष्य उद्धवस्त करेन. त्याने मला खूप मारलं म्हणून मी पोलिसात तकरार दाखल केली. मी या सगळ्या प्रकाराविषयी सिद्धर्थच्या आईला देखील कल्पना दिली होती. मी तीला सांगितले होते की तुम्ही तुमच्या मुलाला समजवा नाहीतर मी पोलिस स्टेशनला जाईन. शिल्पा शिंदेच्या या आरोपावर अद्याप सिद्धार्थ शुक्लाने प्रतिक्रीया दिलेली नाहीये.