Khatron Ke Khiladi 11मधील अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

Shweta Tiwari Hospitalised Due To Low Blood Pressure
Khatron Ke Khiladi 15मधील अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) नुकतीच स्टंट बेस्ड रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ (Khatron Ke Khiladi 11) मध्ये दिसली होती. माहितीनुसार, श्वेता तिवारी लवकरच ‘बिग बॉस १५’ (Bigg Boss 15) मध्ये ट्रायब लीडर म्हणून दिसणार आहे. परंतु व्यस्त शेड्यूलमुळे श्वेताला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. (Shweta Tiwari Hospitalised)

मुंबईतील एका रुग्णालयात श्वेता तिवारीवर उपचार सुरू आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पुस्तक वाचतानाचा स्वतःचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये श्वेता तिवारीच्या हातावर ड्रिप चढणारी नीडल लावली होती. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आणि त्यांनी अभिनेत्रीच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरू केले.

दरम्यान श्वेता तिवारीच्या टीमने स्टेटमेंट जारी करताना सांगितले की, ‘अभिनेत्री ठीक आहे आणि रिकव्हर होत आहे. वातावरण बदल्यामुळे तिला कमकुवतपणा आणि लो ब्लड प्रेशर झाला होता. आता ती बरी आहे.’ टीमने पुढे सांगितले की, ‘आम्हाला अनेक कॉल्स येत आहेत आणि सर्व श्वेता तिवारीच्या आरोग्या विषयी अपडेट विचारत आहेत. आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की, श्वेताला कमकुवतपणा आणि लो ब्लेड प्रेशरमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सतत अभिनेत्री ट्राव्हल करत होती, ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले होते. ज्यांनी श्वेताच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत. ती हळूहळू ठिक होत आहे आणि ती भरपूर आराम करत आहे. ती लवकरच पुन्हा परतेल.’


हेही वाचा – Busan International Film Festival : आंतरराष्ट्रीय ‘बुसान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अली फजलची बाजी