घरमनोरंजनBig Boss Marathi 3: म्हणूनच किर्तनकार 'शिवलीला', आईनेच सांगितला नावाचा किस्सा

Big Boss Marathi 3: म्हणूनच किर्तनकार ‘शिवलीला’, आईनेच सांगितला नावाचा किस्सा

Subscribe

शोमध्ये किर्तनकार शिवलीला बाळासाहे पाटील यांची एण्ट्री झाली आहे.

बिग बॉस मराठीच्या(bigg bass marathi 3) तिसऱ्या पर्वाला धमाकेदार सुरूवात झाली असून अनेक रंजक वळण स्पर्धकांच्या एंट्रीलाच पाहायला मिळत आहे. 19 सप्टेंबर पासून स्पर्धकांचा बिग बॉसच्या वादग्रस्त घरात प्रवेश झाला आहे. अनेक कलाकार मंडळी पासून ते राजकीय व्यक्ती घरामध्ये आपला खरा रंग दाखवण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान घरामध्ये पहिल्यांदाच एका किर्तनकार यांची वर्णी लागली आहे. (bigg boss marathi 3 Story Behind Shivalila Balsaheb Patil)यामुळे घरामध्ये यावेळी काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. शोमध्ये किर्तनकार शिवलीला बाळासाहे पाटील यांची एण्ट्री झाली आहे.

शिवलीला यांचा प्रोमो पाहून सर्वांच्या नजरा त्यांच्यवर खिळल्या. बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर घरामध्ये दाखल होण्यापूर्वी शिवलीला यांचे आई-वडिल त्यांना भेटण्यासाठी मंचावर हजर झाले होते. या दरम्यान महेश मांजरेकरांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे नाव शिवलीला असे का ठेवण्यात आले असा प्रश्न विचारला.  शिवलीला यांच्या आईने सांगितले की, लग्नानंतर जवळपास सात वर्षे झाल्यनंतर देखील आम्हाला मुल झाले नव्हते. यानंतर आम्ही शिवलीला या ग्रंथाचे 108 वेळा पारायण केले. दुसऱ्या दिवशी मला बाळ झाल्याचे स्वप्न पडले. ही सर्व गोष्ट शिवलीलाच्या आईने त्यांच्या घरच्यांना सांगितली आईला सांगितली मात्र कोणीही माझ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी मी डॉक्टरांकडे तपासणी साठी गेली तेव्हा डॉक्टरांनी मी गरोदर असल्याचे सांगितले. आणि गोंडस मुलीचा जन्म झाला यानंतर आम्ही हिचे नाव शिवलीला ठेवले. शिवलीला यांच्या आईची भावूक कहाणी ऐकून काही वेळ सेटवरील वातावरण देखील भावनिक झाले होते.

- Advertisement -

 शिवलीला या तरुण पिढीचं नेतृत्व करत असून समाजप्रबोधनाचे महत्वपूर्ण काम शिवलीला करत आहेत. वयाच्या अवघ्या पाच वर्षाच्या असल्यापासून त्यांनी किर्तन करण्यास सुरूवात केली आणि भक्तीभावाच्या मार्गाने तरुणांना ते महत्वपूर्ण संदेश देण्याचे काम करत आहेत.


हे हि वाचा – IPL 2021- अभिनेता वरुण शर्मा करणार आयपीएल होस्ट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -