घरमनोरंजनबिग-बींची बॉलीवूडमध्ये ५० वर्ष; अभिषेक झाला भावूक!

बिग-बींची बॉलीवूडमध्ये ५० वर्ष; अभिषेक झाला भावूक!

Subscribe

७ नोव्हेंबर १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 

आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरडूपर हिट चित्रपट देत बॉलीवूडचे शेहनशाह बनलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीला आज ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानित्ताने आज त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण आजच्या दिवशी त्यांचा मुलगा तसेच बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन मात्र भावूक झाला आहे. ७ नोव्हेंबर १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

- Advertisement -

अभिषेकची इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट

अभिनेता अभिषेक बच्चन याने आपले वडील अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडमध्ये ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमिताभ बच्चन यांचा जुना फोटो शेअर केला आहे. अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचा केवळ मुलगा म्हणूनच नव्हे तर एक अभिनेता आणि तुमचा चाहता म्हणून सांगतो की आम्हा सर्वांना तुम्हाला पाहता येणे हे आमचे भाग्य आहे. तुमचा आदर करण्यासारखं, तुमच्याकडून शिकण्यासारखं आणि तुमचं कौतुक करण्यासारखं किती आहे. सिनेमाप्रेमींच्या अनेक पिढ्या अभिमानाने सांगतात की आम्ही बच्चन यांचा काळ जगलो. सिनेसृष्टीत ५० वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन पा! आता आम्ही पुढील ५० वर्षांची वाट पाहत आहोत.’

सात हिंदुस्तानी मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण

७ नोव्हेंबर १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत आनंद चित्रपटात काम केले. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना सहाय्यक अभिनेता या कॅटेगरीसाठी पहिला फिल्मफेयर अॅवॉर्ड मिळाला होता. जंजीर, आनंद, शोले, दीवार, डॉन, कूली, अग्निपथ, ब्लॅक, पा, पीकू यासारख्या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी दाद दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -