Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'माझ्या नवऱ्यापासून लांबच राहा' डिंपलने दिली होती रेखाला 'वॉर्निंग'

‘माझ्या नवऱ्यापासून लांबच राहा’ डिंपलने दिली होती रेखाला ‘वॉर्निंग’

Related Story

- Advertisement -

सुपरस्टार राजेश खन्ना, रेखा आणि डिंपल कापडिया या तिन्ही नावांनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या तिघांमध्ये चांगली मैत्रीही होती. पण नंतर असे काही झाले की, डिंपलने रेखाला पती राजेश खन्नापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डिंपल आणि रेखाची मैत्री मात्र तुटली ती कायमची.

बॉलिवूडमधल्या पडद्यावर आणि पडद्याबाहेर अनेक जोड्या हीट झाल्या आहेत. त्यातही अमिताभ बच्चन आणि रेखा यांच नाव तर अजरामरच झालं आहे. पण कोणे एकेकाळी शहेनशाहा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रेखाची जवळीक राजेश खन्नाबरोबरही वाढली होती. राजेश खन्ना आणि रेखा यांनी ९ सिनेमात एकत्र काम केले. त्यातील अगर ‘तुम ना होते’, ‘नमक हराम’ आणि ‘राम तेरे कितने नाम है’ हे सिनेमे सुपरहिट झाले. प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले होते. राजेश खन्नाची पत्नी डिंपल यांचीही रेखाबरोबर मैत्री झाली. पण याचदरम्यान, राजेश आणि रेखा शूटिंग नंतर एकत्र वेळ घालवत असल्याचे डिंपलला कळाले. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर मात्र राजेश आणि रेखाच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या मीडियात येऊ लागल्या. त्यानंतर मात्र डिंपलचा पारा चढला आणि तिने तडक रेखाचे घर गाठले आणि राजेशपासून लांब राहा. अन्यथा भयंकर परिणाम होतील असा धमकी वजा इशाराच दिला.

- Advertisement -

याप्रकारामुळे रेखा मात्र भलतीच चिडली. पण डिंपलच्या धमकीनंतरही राजेश खन्ना यांनी रेखाबरोबर एकत्र सिनेमे करणे थांबवले नाही. यामुळे अखेर डिंपल आणि राजेश यांच्यातील वैवाहिक संबंध अधिकच बिघडले.


हेही वाचा – सिंघम गर्ल वयाच्या पाचव्या वर्षापासून ‘या’ आजाराने ग्रस्त!


- Advertisement -

 

- Advertisement -