घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेता सचिन जोशी ईडीच्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेता सचिन जोशी ईडीच्या ताब्यात

Subscribe

१८ तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून कलाकार, उद्योजक, राजकीय नेत्यांवर धाड सत्र सुरु आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक असलेला सचिन जोशीलाही (ED arrests actor sachin joshi) सक्तसवसुली संचलनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्या आहे. ओमकार रिअॅल्टर्स प्रकरणी ईडीने (omkar builder money laundering) ही कारवाई केली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई झाली आहे. सचिन जोशीची अटकेआधी १८ तासांची सखोल चौकशी करण्यात आली होती.

विजल मल्ल्याचा गोव्यातील किंगरफिश व्हिला लिलावा दरम्यान सचिन जोशीने खरेदी केला होता. त्याचप्रमाणे प्लेबॉय फ्रॅचाइजीचा तो मालक आहे. या कंपनीचे देशातील अनके शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि क्लब हाऊस आहेत. देशातील पान मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुगंधी परफ्यूमची निर्मिती करणाऱ्या जे.एम.जोशी ग्रुपचा तो मालक आहे. त्याशिवाय अनेक रेस्टॉरंट आणि मद्य व्यवसाय या ग्रुपकडून चालवले जातात. आयकर विभागानेदेखील गेल्या आठवड्यात सचिन जोशीच्या निवासस्थानी आणि कार्लयांची छापा टाकला होता. जवळपास तीन ते चार तास अधिकाऱ्यांकडून तपास सुरु होता.

- Advertisement -

ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -