घरताज्या घडामोडीSalim Ghause Death: बॉलिवुड अभिनेता सलीम घोष यांचे निधन

Salim Ghause Death: बॉलिवुड अभिनेता सलीम घोष यांचे निधन

Subscribe

बॉलिवुड अभिनेता सलीम घोष यांचे गुरूवारी वयाच्या ७० व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. बुधवारपासूनच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती पत्नी अनिता सलीमने केली आहे. छातीत कळ आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण गुरूवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सलीम घोष यांचा जन्म हा चेन्नईत झाला होता. भारतीय चित्रपट उद्योग, टेलिव्हिजन आणि थिएटर क्षेत्रातील ते कलाकार होते. भारतातील अनेक भाषांमध्ये त्यांनी काम केले होते. ये जो है जिंदगी, सुबह, भारत एक खोज, एक्स जोन आणि संविधान यासारख्या टेलीव्हिजन शो मध्ये त्यांनी काम केले होते. सलीम घोष यांनी फक्त हिंदीच नव्हे तर तामिळ शिवाय अन्य भाषांमध्ये काम केले होते. त्यांचे एक्टिंगचे करिअर १९६५ मध्ये रिलीज झालेल्या स्वर्ग नर्कच्या माध्यमातून सुरू झाले. त्यांनी शाहरूख खान आणि माधुरी दीक्षितचा चित्रपट कोयला यामध्येही उत्तम काम केले होते.

- Advertisement -

कोणत्या चित्रपटांमुळे मिळाली ओळख?

दिवंगत अभिनेता श्याम बेनेगल यांची टीव्ही मालिका भारत एक खोज यामधून रामाची, कृष्णाची, टीपू सुल्तानची भूमिका केल्यासाठी त्यांना ओळख मिळाली. तसेच टेलिव्हिजन सीरियल वागले की दुनिया या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सुबह या मालिकेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. त्यांनी १९९५ च्या द लायन किंग च्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य जबाबदारी पार पाडली. बॉलिवुडच्या कोयला, शपथ, अक्स, वेल डन अब्बा, सारांश, स्वर्ग नरक यासारख्या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. सलीम घोष डिसीवर्स, द परफेक्ट मर्डर यासारख्या चित्रपटांचाही भाग राहिले आहेत. तर मणिरत्नमचा चित्रपट थिरूडा थिरूडा मध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -