Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी टायगर श्रॉफच्या 'गणपत' सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

Subscribe

पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार क्रिती सॅनेनचे Action सीन्स

हॉलिवूड सिनेमांमध्ये स्टंटबाजीचे सीन्स पाहण्याकडे सिनेरसिक नेहमीच पसंती दर्शवतात. जेम्स बाँड, टॉम क्रूज यांसारख्या दिग्गज हॉलिवूड सिनेअभिनेत्यांचे सिनेमा पाहण्याकडे सिनेचाहत्यांचा अधिक कल असतो. मात्र, आता चित्र काहिसं बदलंल आहे. हॉलिवूड सिनेमांच्या स्पर्धेत बॉलिवूड सिनेमांचाही आता सिनेविश्वात गाजावाजा होत आहे. पीळदार शरिरयष्टीनं बांधलेला आणि अखंड परिश्रम घेत नेहमीच बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये अष्टपैलू अभिनयाची छटा उमटवणारा अभिनेता म्हणजेच टायगर श्रॉफ. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. नुकतंच टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात सुंदर रुपवती अभिनेत्री क्रिती सॅनेन एका अनोख्या अंदाजात झळकणार आहे. पहिल्यांदाच क्रितीचे Action सीन्स पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे ‘गणपत’ सिनेमात क्रितीची दिमाखदार अदा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

‘गणपत’ सिनेमाचा २० सेकंदांचा टीझर सोशल मीडियावर खुद्द क्रितीने शेअर केला आहे. या टीझरला नेटकऱ्यांकडून वाहवा मिळतेय. हा टीझर शेअर करताना क्रितीने कॅप्शन मध्ये म्हटलंय, ‘जस्सी ला भेटा!! तिला भेटण्यासाठी मी खूप आतूरतेनं वाट पाहत आहे. पुन्हा एकदा मला माझ्या फेव्हरेट टायगर श्रॅाफसोबत काम करायला आवडणार आहे. मला प्रतिक्षा आहे ती केवळ या सिनेमाच्या शूटिंगच्या शुभारंभाची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

याआधीही ‘हिरोपंती’ सिनेमात झळकलीय टायगर-क्रिती जोडी!

क्रिती सॅनेनने तिच्या पहिल्या फोटोची झलक चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केलीय. मात्र, क्रितीची अदा पाहून टायगरनेही त्याच्या सोशल अकाउंटवर क्रितीचा ‘गणपत’ सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांकडून जबरदस्त पसंती दर्शवली जात आहे. त्याचबरोबर चाहतेही क्रितीचा फर्स्ट लूक शेअर करण्याच व्यग्र आहेत. याआधी ‘क्रिती-टायगर’ जोडी ‘हिरोपंती’ सिनेमात झळकली होती.

आगामी ‘बच्चन पांडे’ सिनेमातही क्रितीची भूमिका!

- Advertisement -

वर्क फ्रंटचं बोलायचं झालं तर टायगर याआधी ‘बागी ३’ या सिनेमात झळकला होता. तर क्रिती आता ‘गणपत’ सिनेमा व्यतिरिक्त ‘बच्चन पांडे’ सिनेमातही भूमिका साकारणार आहे. ‘बच्चन पांडे’ सिनेमात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षयचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे.


हेही वाचा – Video: अंकिता लोखंडेच्या ‘अरे रे आरे क्या हूआ’ गाण्यावर दिलखेच अदा


 

- Advertisment -