आयटम नंबर फेम अभिनेत्रीचे १६ व्या वर्षी वेटरचे काम, मिळाली वाईट वागणूक

bollywood nora fatehi reveals she worked as a waitress when she was 16 years old
आयटम नंबर फेम अभिनेत्रीचे १६ व्या वर्षी वेटरचे काम, मिळाली वाईट वागणूक

बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी कोणतेही फिल्म बॅकग्राऊंड नसताही त्यांच्या कौशल्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा आपल्या डान्स मूव्स आणि हॉटनेसमुळे नेहमची चर्चेत असते. तसेच नोराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नोराचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक मूव्हवर कोट्यावधी चाहते घायाळ होत असतात. हिच लोकप्रिय डान्सर अभिनेत्री नोरा फतेही एकेकाळी वेट्रेसचे काम करत होती. याबाबत तिने स्वतः खुलासा केला आहे. नोराला या काळात लोकांच्या वाईट वागण्याला सामोरे जावे लागले होते. परंतु अशी परिस्थिती कशी हाताळावी हे माहिती असले पाहिजे असे नोराचे मत आहे.

अलीकडेच नोरा एका कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये पोहोचली होती. त्यावेळेस तिने तिच्या स्ट्रगलबाबत सांगितले. नोराने सांगितले की, ‘ती जेव्हा १६ वर्षांची होती, तेव्हा ती वेट्रेसचे काम करत होती. जवळपास २ वर्ष म्हणजे १८ वर्षांपर्यंत ती वेटर म्हणून काम करत होती.’

यावेळेस तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. पुढे नोराने सांगितले की, ‘एक वेटर होणे खूप कठीण आहे. तुमचे संवाद कौशल्य चांगले असले पाहिजे. व्यक्तिमत्व चांगले असले पाहिजे. तसेच आपल्याकडे तीक्ष्ण असणे, स्मरणशक्ती असणे आवश्यक आहे. कधी-कधी ग्राहक चांगले वर्तन करत नाहीत. अशी परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. हा माझ्याकडे एक साईड जॉब होता. मी तिथून सहज पैसे कमवत होती. मला वाटते ही कॅनडामध्ये संस्कृती आहे, तिथे सर्वांकडे नोकरी असते. तिथे शाळेत जातात आणि नोकरीही करतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नोरा अलीकडेच अभिषेक दुधैया दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हासोबत दिसली होती.


हेही वाचा – Bollywood सोडल्यानंतर जायरा वसीमने २ वर्षांनी शेअर केला फोटो, बघा आता कशी दिसते