घरमनोरंजनविद्या बालन अन् शेफाली शाह स्टारर 'Jalsa' चा ट्रेलर आऊट

विद्या बालन अन् शेफाली शाह स्टारर ‘Jalsa’ चा ट्रेलर आऊट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर जलसा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात विद्या विद्या बालन पत्रकाराची भूमिका साकारत असून शेफाली शाह एका आईच्या भूमिकेत झळकणार आहे. या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर स्वत: विद्या बालनने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “कल्पनेपेक्षा सत्य अधिक आश्चर्यकारक आहे. ‘जलसा’ 18 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर येत आहे.

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या चित्रपटात विद्या-शेफाली व्यतिरिक्त मानव कौल, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन यादव, सूर्या काशीभटला आणि शफीन पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

विद्या या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारत असून शेफाली शाह एका आईच्या भूमिकेत आहे जी एक रहस्य लपवत आहे. ट्रेलरची सुरुवात एका मुलीच्या एन्ट्रीने होते जिचा नंतर अपघात होतो. यानंतर या प्रकरणाची मीडियात चर्चा सुरु होते. शेफाली शाहला या मुलीच्या आईच्या भूमिकेत दाखवण्यात आले. मात्र या मुलीच्या मृत्यूमुळे शहरात एकचं खळबळ उडते. या मुलीच्या मृत्यूमागची अनेक गुपिते समोर येत राहतात. मात्र त्या मागची सत्य घटना ही त्या मुलीच्या कुटुंबियांनाच माहीत असते. ट्रेलरच्या शेवटी मृत मुलीचा भाऊ मला सर्व माहित असल्याचे सांगताना दिसतोय.  विद्या आणि शेफालीचा जबरदस्त परफॉर्मन्स ट्रेलरमध्येच पाहायला मिळतो. ‘एक सच जो सबका सीक्रेट बन जाए’ अशी टॅगलाइन ट्रेलरमधून पाहायला मिळतेय.


जलसाचा आकर्षक ट्रेलर आपल्याला माया (विद्या बालन) आणि रुक्साना (शेफाली शाह) या दोन मुख्य पात्रांची ओळख करून देतो, हे कथानक त्यांच्या सभोवतालची अराजकता, रहस्ये आणि खोटेपणा, सत्य आणि फसवणूक यामुळे त्यांच्या सभोवतालच्या जगाला गोंधळात टाकणारी जीवन बदलणारी घटना तसेच विमोचन आणि प्रतिशोधाचे द्वंद्व युद्ध याभोवती फिरते. उत्कंठावर्धक कथानक, उत्कृष्ट अभिनय याद्वारे जलसा चित्रपटाची कथा पुढे सरकते.

- Advertisement -

सुरेश त्रिवेणीने यापूर्वी विद्या बालनसोबत प्रेक्षकांच्या आवडत्या ‘तुम्हारी सुलू’साठी काम केले आहे आणि आता ही जोडी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी एकत्र येत आहे. आणि पहिल्यांदाच, दोन पॉवर परफॉर्मर्स – विद्या बालन आणि शेफाली शाह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. जलसाचा जागतिक प्रीमियर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर १८ मार्च रोजी भारतात आणि जगभरातील इतर २४० देशांमध्ये होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -