घरमनोरंजन‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ ची भारतात कोटीची उड्डाणे

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ ची भारतात कोटीची उड्डाणे

Subscribe

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चे किती चाहते आहेत हे चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आपल्याला कळलचं. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूडपट कधी एकदा प्रदर्शित होतोय असं त्याच्या चाहत्यांना झालं होतं. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची धडपड चाहत्यांची झाली. पहिल्याच दिवशी या चित्रपटात ५० कोटींची कमाई केली आणि दुस-या दिवशीही इतकाच गल्ला जमवत, १०० कोटींवर आपलं नाव कोरलं. म्हणजेच केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला आणि नवा विक्रम रचला.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५३.१० कोटी रूपयांचा बिझनेस केला. दुस-या दिवशी कमाईत थोडी घट झाली. याचसोबत ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या दोन दिवसांच्या कमाईचा एकूण आकडा १२४.४० कोटींवर पोहोचला.

- Advertisement -

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूडपट भारताच्या २८४५ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रिन्स ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला मिळाल्या आहेत.

मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अॅ्व्हेंजर्स- द एंडगेम’ या हॉलिवूडपटाची भारतीयांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कमाईच्या आकड्यावरूनच ही क्रेझ केवळ भारताच नाही तर संपूर्ण जगात असल्याचं दिसलं.भारतात इंग्लिश व हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेत हा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘अॅ व्हेजर्स- एंडगेम’  हा मार्वेल स्टुडिओजचा २२ वा चित्रपट आहे. ‘अॅ्व्हेंजर्स- द एंडगेम’हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात मार्वेल सीरिजच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -