घरमनोरंजनदेसी गर्लला भेटण्यासाठी देसी बॉयने मारली भिंतीवरून उडी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

देसी गर्लला भेटण्यासाठी देसी बॉयने मारली भिंतीवरून उडी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Subscribe

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भारतात आहे. जवळपास तीन वर्षांनंतर प्रियंका भारतामध्ये आली आहे. भारतात आल्यापासून प्रियंका अनेक इंवेट्सला भेटी देत आहे. याचंदरम्यान, प्रियंका चोप्राचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. प्रियंकाच्या काही फोटो आणि व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मात्र, प्रियंकाचे चाहते ती भारतामध्ये आल्यामुळे खूप खूश झाले आहेत. याचंदरम्यान, प्रियंका चोप्रासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे.

प्रियंकाच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ
बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियंका तिच्याबद्दल अनेक अपडेट देत असते. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी प्रियंकाने ती लखनऊला जात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती लखनऊला पोहोचली आणि तिथल्या निगोहाच्या लालपूरमधील एका आंगणवाडीमध्ये भेट दिली. यावेळी असा काही प्रकार घडला ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल. खरंतर, प्रियंका चोप्रा आंगणवाडीमध्ये फिरत असताना त्यावेळी एक तरुण प्रियंकाला भेटण्यासाठी भिंत ओलांडून आतमध्ये आला. परंतु यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं आणि पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यामुळे आता प्रियंकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘ग्लोबल यूनिसेफची गुडविल Ambassador’ आहे प्रियंका

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका अभिनया व्यतिरिक्त समाज सेवेचं देखील काम करते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते. 2016 मध्ये प्रियंकाची ‘ग्लोबल यूनिसेफ गुडविल Ambassador’ म्हणून निवड करण्यात आली होती. ज्यानंतर ती खूप चर्चेत आली.

- Advertisement -

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप
प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये तिने सतीची भूमिकेत दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 


हेही वाचा :

मुलीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीर झाला भावूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -