घरमनोरंजनहौशी आणि व्यावसायिक रंगभूमी कलावंताना उत्तम संधी देणार, सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही

हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी कलावंताना उत्तम संधी देणार, सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही

Subscribe

फोंडा, गोवा : महाराष्ट्रातील हौशी रंगभूमी आणि कलावंत तसेच व्यावसायिक मंच या सर्वांना चांगली संधी उपलब्ध व्हावी; नाटयगृहे प्रशस्त, अद्ययावत व्हावी व त्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य होईल, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला.

येथे रविवारी आयोजित 59व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे मंचावर उपस्थित होते.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना, नाट्यक्षेत्रासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मराठी राज्य नाट्यस्पर्धा लवकरच ऑनलाइन घेण्यात येईल. तसेच पूर्वी 6 विभागांत होणारे नाट्य प्रशिक्षण शिबिर यापुढे 12 विभागांत होईल, असे ते म्हणाले. बालनाट्य स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याखेरीज पारितोषिकांची रक्कम वाढविणे, परीक्षकांचे मानधन वाढविणे यांचाही प्राधान्याने विचार करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवांवर महानाट्ये करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर दुर्मीळ नाटकाच्या संहिता जपण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा तसेच स्थानिक बोलीभाषेत एकांकिका स्पर्धा सुरू करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला. सांस्कृतिक विभागाचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून यामुळे कलावंत आणि त्यांच्या संस्था यांना योग्य वार्षिक नियोजन करता येईल व त्यातून दर्जेदार निर्मिती प्रेक्षकापर्यन्त पोहोचेल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हॅप्पीनेस इंडेक्स ही सांस्कृतिक विभागाची जबाबदारी
“इकॉनॉमिक ग्रोथ” तर हवाच सोबत “हॅप्पीनेस इंडेक्स” वाढावा यासाठी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. धनाने भौतिक साधन-सुविधा मिळविता येतील, मनाच्या समाधानासाठी त्याचे मूल्यांकन करण्यासाठी सांस्कृतिक संपन्नता देखील आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही मराठी भाषिक राज्ये यामध्ये मागे राहणार नाहीत, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. गोव्यातील नाट्य चळवळीचे आणि रसिकांचेही मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक यावेळी केले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -